अलिबाग : रायगड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून २६ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. पेट्रोल पंपावर केवळ अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना इंधन मिळणार आहे. तशी अधिसूचना रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिल्या आहेत.
अलिबाग : रायगड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ । १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून २६ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन । पेट्रोल पंपावर केवळ अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना इंधन मिळणार । जिल्हाधिकारी यांची अधिसूचना जारी #Lockdown #Corona #coronavirus #Covid19
@ashish_jadhao pic.twitter.com/mhhVuyGXmp— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 15, 2020
रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी २४ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना जारी करत हा लॉकडाऊन १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून २६ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवला आहे. किराणा, भाजीपाला, चिकन, दूध यांची घरपोच सेवा सुरु राहणार आहेत. तसेच दारूच्या घरपोच सेवेलाही परवानगी असणार आहे. मात्र, पेट्रोल पंपावर केवळ अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना इंधन मिळणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा नको, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचवेळी अत्यावश्यक असेल आणि तुम्ही घराबाहेर पडत असाल तेव्हा मास्क हा अनिवार्य आहे. दैनंदिन काम करताना सुरक्षित अंतर ठेवून काम करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.