Maharashtra Breaking News LIVE Updates: निकालाच्या 12 तासांतच महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार - वडेट्टीवार

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या शनिवारी लागणाऱ्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. याचप्रमाणे दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स येथे जाणून घ्या.... 

Maharashtra Breaking News LIVE Updates: निकालाच्या 12 तासांतच महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार - वडेट्टीवार

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या संक्षिप्त आढावा येथे जाणून घ्या.  

22 Nov 2024, 09:34 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates:  निकालाआधी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिरात

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिरात पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत संजय निरुपम उपस्थित होते. याशिवाय केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनीही तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिराला भेट दिली. ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज गंगाराम अहिर यांनी तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिरात दर्शन घेतलं.

22 Nov 2024, 09:19 वाजता

IND vs Aus 1st Test भारताला तिसरा मोठा धक्का, विराट कोहली 5 धावा करून बाद

IND vs AUS BGT: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, पर्थ कसोटी आज शुक्रवार 22 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 7.50 वाजता सुरू झाला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची कमान कार्यवाहक कर्णधार जसप्रीत बुमराह सांभाळत आहे. सुरुवातीलाच यशस्वी जैस्वाल 0 धावांवर बाद झाला आहे. त्यानंतर देवदत्त पडिक्कलही बाद झाला. यानंतर विराट कोहली (Virat Kohli ) 5 धावा करून बाद झाल्याने भारताला तिसरा मोठा धक्का मिळाला आहे. 

22 Nov 2024, 09:06 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंबईतील चेंबूरमध्ये पोलिसांच्या निर्भया वाहनाचा अपघात

चेंबूरच्या छेडा नगर येथे पहाटे मुंबईत पोलिसांच्या निर्भया वाहनाचा अपघात झाला आहे. घाटकोपरहून पेट्रोल भरून येत असताना पोलिस व्हॅनने ट्रेलरला  धडक दिली. अपघातात २ पोलिस कर्मचारी जखमी झाले असून जयदीप पाटील आणि साहिल खामकर अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेहण्यात आले आहे. तर ट्रेलरचा चालक बिपीन सिंग याला टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा अपघात नेमका कसा झाला, कुणाची चूक होती. याचा तपास पोलिस करत आहेत. 

22 Nov 2024, 08:23 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या, कोर्टात हजर राहण्याचे आले समन्स

अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स आले आहे. बारामतीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर राहण्याबाबत समन जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी ही माहिती माध्यमांना दिली.  २०१४ च्या निवडणुकीत अजित पवारांनी उमेदवाराला मतदान केले नाही तर गावच पाणी बंद करू अस वक्तव्य केल्यामुळे कोर्टाने हे समन्स बजावले असल्याचे खोपडे यांनी सांगितले.  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. सातत्याने प्रचार दौऱ्यावर असलेल्या नेत्यांना दोन दिवस विश्रांती आहे. आता २३ नोव्हेंबर रोजी निकाल आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणी वाढवणारी बातमी आली आहे. अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. आता १६ डिसेंबर रोजी अजित पवार यांना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. 

22 Nov 2024, 08:11 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंबईत चार हजार डेंग्यूचे रुग्ण, १० महिन्यांत २५ जणांचा मृत्यू

डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व उपाययोजना करूनही यावर्षी ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात सर्वाधिक - म्हणजे चार हजार ८९५ डेंगीच्या रुग्णांची नोंद एकट्या मुंबईत झाली आहे. त्याचवेळी, महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत १६,७३२ लोकांना डेंगीची लागण झाल्याचे चित्र आहे. याचा अर्थ राज्यात डेंगीच्या एकूण रुग्णांपैकी २९ टक्के रुग्ण हे मुंबईत आहेत. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी २२ केंद्रांवरून पावसाळी आजारांचे अहवाल प्राप्त व्हायचे, मात्र आता केंद्रे वाढवण्यात आली आहेत. महानगरात ८८० केंद्रे सुरू केली आहेत. त्यामुळे डेंगीच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. यंदा राज्यात १० महिन्यांत डेंगीमुळे २५ जणांना जीव गमवावा लागला आहे.