Maharashtra Breaking News LIVE Updates: निकालाच्या 12 तासांतच महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार - वडेट्टीवार

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या शनिवारी लागणाऱ्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. याचप्रमाणे दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स येथे जाणून घ्या.... 

Maharashtra Breaking News LIVE Updates: निकालाच्या 12 तासांतच महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार - वडेट्टीवार

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या संक्षिप्त आढावा येथे जाणून घ्या.  

22 Nov 2024, 17:25 वाजता

आम्हाला योग्य तो मानसन्मान द्यावा - हितेंद्र ठाकूर 

सत्तेसाठी आकड्यांची जमवाजमव करताना सर्व युती आणि आघाड्यांकडून फोनवर संपर्क साधण्यात येत असल्याचं बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर म्हणालेत...त्याचबरोबर आम्हाला योग्य तो मानसन्मान द्यावा लागणार असल्याचंही ते म्हणालेत...

 

22 Nov 2024, 17:03 वाजता

विनोद तावडेंची राहुल गांधी, खरगेंना कायदेशीर नोटीस

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सुप्रिया श्रीनेत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. विरार पैसे वाटप प्रकरणात आपली नाहक बदनामी केल्याचा आरोप करत, विनोद तावडे यांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. 

22 Nov 2024, 16:24 वाजता

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विजयाचे बॅनर

विधानसभा निवडणुकीच्या निकाला आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या पडवळ नगर भागात विजयाचे बॅनर कार्यकर्त्यांनी लावले आहेत. बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो तर त्यांनी केलेल्या विकास कामांचेही फोटो दर्शवण्यात आलाय.

 

22 Nov 2024, 15:31 वाजता

महाविकास आघाडी आणि महायुतीकडून बच्चू कडूंना फोन 

महाविकास आघाडी आणि महायुतीकडून बच्चू कडूंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही आघाडीकडून समर्थन देण्याची विनंती बच्चू कडूंना करण्यात आल्याची माहिती सूत्रानं दिलीय. बच्चू कडू निकालानंतर उद्या पुढील निर्णय घेणार असल्याच सूत्रांनी सांगितलंय. प्रहारचे 10 ते 15 आमदार निवडून येणार असा विश्वास बच्चू कडूंना आहे. बच्चू कडू सध्या मुंबईत दाखल झाले. बच्चू कडू नेमकं कुणाला पाठिंबा देणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. 

 

22 Nov 2024, 15:16 वाजता

मराठवाड्यातील काही अपक्ष उमेदवार विजयी होण्याची शक्यता 

मराठवाड्यातील काही अपक्ष उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. विजयी होणाऱ्या अपक्ष आमदारांशी महायुती, मविआकडून संपर्क केल्याची माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिलीय. रमेश आडसर माजलगावातून विजयी होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती समोर आलीय. हर्षवर्धन जाधव हे कन्नडमधून विजयी होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यासोबत भिमराव धोंडे आष्टीमधून जिंकण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. 

 

22 Nov 2024, 15:14 वाजता

सत्ता स्थापनेसाठी मविआ आणि महायुतीची जुळवाजुळव सुरू

निकाल लागण्यापूर्वीच सत्ता स्थापनेसाठी मविआ आणि महायुतीची जुळवाजुळव सुरू झाली आहे. छोट्या घटकपक्ष आणि नेत्यांशी महायुतीकडून संपर्क सुरुवात केलीय. बहुजन विकास आघाडी, मनसे, प्रहार जनशक्ती आणि इतर पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास छोट्या छोट्या घटक पक्षाची मोट बांधण्याच्या तयारीत सुरु झाली आहे. सन्मानजनक वाटा देऊन सहभागी करून घेण्यावर भर दिला जातोय.

 

22 Nov 2024, 15:04 वाजता

देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गाठीभेटी सुरु

विधानसभेच्या निकालापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर खलबतं सुरूयेत...भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, गिरीष महाजन, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्यात बैठक सुरूये...सपष्ट बहुमत न मिळाल्यास पुढची रणनीती काय यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यताय...

 

22 Nov 2024, 15:04 वाजता

राष्ट्रवादीचा अपक्षांना गळाला लावण्याची तयारी

राष्ट्रवादी पक्षाकडून अपक्ष उमेदवारांना गळाला लावण्याची तयारी सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यातील अपक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. बीड, माजलगाव, आष्टी, गेवराईमधले अपक्ष गेमचेंजर ठरु शकतात. त्यामुळे विजयी ठरु शकतील अशा अपक्षांना हाताशी धरण्याकरता प्रयत्न सुरु झालेत. बीड जिल्ह्यात 81 अपक्ष उमेदवार मैदानात आहेत. ते विजयी झाल्यास राष्ट्रवादीसाठी तो मोठा फटका असेल. विशेष म्हणजे 1962 पासून आतापर्यंत 6 वेळा अपक्ष उमेदवार आमदार झाले आहेत. 

 

22 Nov 2024, 14:17 वाजता

तीन दिवसात सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता- प्रा. उल्हास बापट

 

Maharashtra Breaking News LIVE Updates:  निवडणूक निकालानंतर सरकार स्थापनेसाठी केवळ तीनच दिवस उपलब्ध आहेत. 26 नोव्हेंबर च्या आत सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. घटना तज्ञ उल्हास बापट यांनी ही माहिती दिलीय. विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत असणाऱ्या नेत्यालाच मुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाऊ शकते. बहुमत नसलं तरी सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या गटाला किंवा त्यांच्या नेत्यालादेखील राज्यपाल सरकार स्थापनेसाठी बोलावू शकतात. मात्र त्यातून घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत राज्यपालांची भूमिका ही राज्यघटनेला धरून तसेच नैतिकतेच्या बाजूने असावी अशी अपेक्षा बापट यांनी व्यक्त केली आहे. सरकार स्थापनेच्या प्रक्रियेतील गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यघटनेमध्ये काही दुरुस्ती देखील आवश्यक असल्याचं बापट म्हणाले. 

22 Nov 2024, 14:02 वाजता

मतदान झाल्यापासून मी जोमात आहे तर विरोधक सगळे कोमात- रमेश आडसकर

 

Maharashtra Breaking News LIVE Updates:  'मतदान झाल्यापासून मी जोमात आहे तर विरोधक सगळे कोमात गेले आहेत. मला अनेक नेत्यांची फोन आले आहेत. ' असे माजलगाव चे अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांचा दावा आहे. 'अजून मी कुणासोबत जायचं ते ठरवलेलं नाही. निकाल लागल्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करणार' असेही ते म्हणाले आहते.