Maharashtra Breaking News LIVE Updates: निकालाच्या 12 तासांतच महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार - वडेट्टीवार

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या शनिवारी लागणाऱ्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. याचप्रमाणे दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स येथे जाणून घ्या.... 

Maharashtra Breaking News LIVE Updates: निकालाच्या 12 तासांतच महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार - वडेट्टीवार

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या संक्षिप्त आढावा येथे जाणून घ्या.  

22 Nov 2024, 13:40 वाजता

'शिंदेंच्या शिवसेनेचे नाराज उमेदवार आमच्या संपर्कात' - नाना पटोले

Maharashtra Breaking News LIVE Updates:  शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक उमेदवार नाराज आहेत कारण भाजपनं त्यांच्या मतदारसंघात अपक्षांना मदत केली, त्यामुळे असे नाराज उमेदवार आमच्या संपर्कात आहेत असे नाना पटोले म्हणाले. २६ तारीख सरकार बसवण्याची शेवटची तारीख आहे.  त्यामुळे निवडून येणा-या आमदारांना लवकरात लवकर मुंबईत पोहोचण्याच्या सूचना आहेत. निकाल आल्यानंतर तातडीनं सर्व आमदारांना मुंबईत बोलावून सह्या घेऊन जमलं तर उद्या संध्याकाळ-रात्रीपर्यंतच आम्ही राज्यपालांना निवेदन देऊ असेही ते म्हणाले आहेत. 

22 Nov 2024, 12:47 वाजता

 टीम इंडिया अवघ्या 150 धावांवर झाली ऑल आउट

India vs Australia Test 2024-25 Live Streaming: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, पर्थ कसोटी आज शुक्रवार 22 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर सुरू असलेल्या या महत्त्वाच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे.  भारतीय संघ पहिल्या डावात 150 धावांवरती ऑल आउट झाला आहे. भारताकडून पहिल्या डावात पदार्पण करणाऱ्या नितीश कुमार रेड्डी याने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय ऋषभ पंतने सर्वाधिक ३७ धावा केल्या. तर केएल राहुलने 26 धावा केल्या.

22 Nov 2024, 12:22 वाजता

आज होणार काँग्रेसच्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक

Maharashtra Breaking News LIVE Updates:  आज दुपारी एक वाजता काँग्रेसच्या उमेदवारांची 1 वाजता ऑनलाईन बैठक बोलवण्यात आली आहे. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथलाजी प्रभारी महराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीत व  मा. प्रांताध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांचा  अध्यक्षतेखाली आज दुपारी १.०० वा. झूम बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

22 Nov 2024, 12:17 वाजता

शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची आज होणार बैठक

Maharashtra Breaking News LIVE Updates: संध्याकाळी ६ वाजता नंदनवन बंगल्यावर शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची बैठक होणार आहे.  निकालाच्या दिवशी प्रवक्त्यांनी कशा पद्धतीने पक्षाची भूमिका मांडावी? यावर होणार बैठकीत चर्चा असल्याची माहिती आहे. 

22 Nov 2024, 11:16 वाजता

"जिकडे संख्याबळ तिकडे जाऊ..." निकालाआधीच प्रकाश आंबेडकरांची राजकीय स्पष्ट भूमिका 

Maharashtra Breaking News LIVE Updates:  प्रकाश  आंबेडकरांनी विधानसभेच्या निकालाआधीच आपली राजकीय भूमिका आता स्पष्ट केली आहे. ज्या पक्षाकडे संख्याबळ असेल त्या पक्षासोबत जाऊ असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. सत्ता स्थापन करणाऱ्यांसोबत जाऊ अशी भूमिका आंबेडकरांनी X या सोशल मीडिया वरून मांडलेली आहे. 

 

22 Nov 2024, 11:04 वाजता

लहान पक्षांशी महायुतीकडून संपर्क साधण्यास सुरूवात; सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू

सत्ता स्थापनेसाठी मविआ आणि महायुतीची जुळवाजुळव सुरू झाली आहे. छोट्या घटकपक्ष आणि नेत्यांशी महायुतीकडून संपर्क करायला सुरुवात झाली आहे. बहुजन विकास आघाडी, मनसे, प्रहार जनशक्ती व इतर पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.  बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास छोट्या छोट्या घटक पक्षाची मोट बांधण्याच्या तयारीत आहेत. सन्मानजनक वाटा देऊन सहभागी करून घेण्यावर भर आहे. 

22 Nov 2024, 10:46 वाजता

आपण टेन्शन घेत नाही आपण टेन्शन देतो; आमच्या शिवाय सरकार बनणार नाही - बच्चू कडू

Maharashtra Breaking News LIVE Updates:  विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले असून आता कोण निवडून येणार अशा चर्चा गाव खेड्यासह शहरांमध्ये रंगल्या आहे. याविषयी बच्चू कडू यांना विचारले असता बच्चू कडूंनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सर्व उमेदवार टेन्शनमध्ये असले तरी आपण टेन्शन घेत नाही उलट दुसऱ्याला टेन्शन देतो असं म्हणत बच्चू कडूंनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. मी राज्यभर चाळीस ते पन्नास सहभाग घेतले असून परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या 20 ते 25 जागा निवडून येणार आहे. तसेच आमच्या शिवाय कोणाचाही सरकार बनणार नाही असेही बच्चू कडू म्हणाले. 

22 Nov 2024, 10:37 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: कापसाचे दर वाढत नसल्याने शेतकरी चिंतेत 

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापूस हे प्रमुख पीक आहे. कापूस काढणीला सुरुवात होऊनही कापसाचे दर वाढत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. उत्पादन खर्च वाढत आहे, मात्र त्या तुलनेत कापसाचे दर वाढत नसल्याचा दावा शेतकऱ्यांचा आहे.

22 Nov 2024, 10:29 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates:  हळद पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली! 

वाशिम जिल्ह्यात यंदा हळद लागवडीचे क्षेत्र वाढले आहे.मात्र, बदलत्या वातावरणामुळे हळद पिकावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.पानांचा करपा, मुळांचा कुज आणि बुरशीजन्य रोगांमुळे हळद उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी केली तरीही रोगराई आटोक्यात येत नसल्याने हळद पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

22 Nov 2024, 10:28 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: बारामतीतील सुपे येथे अजित पवार यांच्या विजयाचे बॅनर!

बारामतीमध्ये अजित पवारांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकले आहेत. अजित पवार यांची सलग आठव्यांदा आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा असा बॅनरवर उल्लेख आहे.  बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा देखील उल्लेख करण्यात आला आहे.