Maharashtra Breaking LIVE : देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला - शरद पवार

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरामध्ये राज्याबरोबरच देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये घडलेल्या ताज्या घडामोडींवर अगदी संक्षिप्त स्वरुपात टाकलेली नजर एकाच क्लिकवर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता...

Maharashtra Breaking LIVE :  देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला - शरद पवार

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर 

26 Dec 2024, 23:17 वाजता

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे. डॅा. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते . भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल. ईश्वर डॅा मनमोहन सिंह यांच्या आत्म्यास चीरशांती देवो ! अेसे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. 

26 Dec 2024, 23:10 वाजता

 डॉ. मनमोहन सिंग विविध सरकारी पदांवर तसेच अर्थमंत्री म्हणून काम केले आणि गेल्या काही वर्षांत आमच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवला. संसदेतील त्यांचा हस्तक्षेपही अभ्यासपूर्ण होता. आपले पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 

26 Dec 2024, 22:35 वाजता

माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे. दिल्लीतील एम्स रूग्णालयात डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला.  काँग्रेसची बेळगावमधील बैठक रद्द करण्यात आली असून राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे दिल्लीला रवाना झाले आहेत. 

26 Dec 2024, 22:31 वाजता

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन

Manmohan Singh Passes Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचं निधन झालं आहे. प्रकृती खालावल्याने आज त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आलं होतं. आपातकालीन विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत होती. ते 92 वर्षांचे होते. मागील अनेक काळापासून ते आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करत होते. याआधी त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा

26 Dec 2024, 21:01 वाजता

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावली आहे.  मनमोहन सिंग यांना AIMS मध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना 8 वाजताच्या सुमारास एम्सच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले.
एम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अनेक डॉक्टरांच्या टीमकडून त्यांची काळजी घेतली जात आहे.

26 Dec 2024, 20:34 वाजता

भुसावळ ते वाशिम जाणाऱ्या एका खाजगी बसचा अपघात झालाय.  यात्रा करून भुसावळ येथे उतरलेल्या वाशिम येथील भाविकांची ही खाजगी बस होती, वाशिमच्या परतीच्या प्रवासासाठी ही बस निघाली होती. बाळापुर शहरा जवळील भिकुंड नदीजवळ अचानक बस चालकाचा तोल गेल्याने बस भिकुंड नदीत पलटी झाली. या बस मध्ये एकूण 49 प्रवासी प्रवास करत होते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बाळापुर पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू असून प्रवाशांना सुखरूनदीत बस कोसळलीप बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहेय.. या पुलावर कठडे नसल्यामुळे अपघात झाला असल्याचाही बोललं जात आहे. 

26 Dec 2024, 19:48 वाजता

ज्येष्ठ साहित्यिक निरंजन घाटे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. निरंजन घाटे यांना वैद्यकीय सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबत त्यांनी निर्देश दिले आहेत. निरंजन घाटे हे विज्ञानविषयक ललित आणि माहितीपर लेखन करणारे साहित्यिक म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. पुणे येथे वास्तव्याला असणारे निरंजन घाटे हे गेले अनेक महिने प्रकृती अस्वास्थ्याचा सामना करत आहेत. राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी उप मुख्यमंत्र्यांना घाटे यांच्या विषयी अवगत केले. त्यावर त्यांना ताबडतोब पाच लाख रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

26 Dec 2024, 19:05 वाजता

Mबीडमध्ये हवेत गोळीबार करणारा आरोपी कैलास फड याला अटक करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कैलास फड याचा हवेत गोळीबार करतांचा व्हिडिओ शेअर केला होता. 

26 Dec 2024, 17:55 वाजता

यवतमाळमध्ये प्रतिबंधित नॉयलॉन मांजा विक्री व पतंगीचा जीवघेणा खेळ सुरूच असून, या मांजाने दुचाकीस्वार बाप लेकाचा भीषण अपघात झाला आहे. मुलाला शाळेत सोडायला निघालेले पत्रकार मनोज जयस्वाल यांच्या गळ्यात अचानक मांजा गुंडाळला गेला, तो काढण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन अपघात घडला. यात मनोज व त्यांचा मुलगा नमन गंभीरित्या जखमी झाले त्यांचा गळा देखील चिरला गेला आहे.

26 Dec 2024, 17:05 वाजता

कल्याणमधील पीडित अल्पवयीन मुलीवर अखेर अंत्यविधी करण्यात आला आहे. नराधम आरोपी विशाल गवळी याला जोपर्यंत फाशीची शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत अंत्यविधी करू दिले जाणार नाहीत असा आक्रमक पवित्रा नागरिकानी घेतला होता. आमचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन द्या, आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली होती. दरम्यान नागरिकांनी रस्ता रोखून धरला आणि ऍम्ब्युलन्स पुढे जाऊ द्यायलाही त्यांनी नकार दिला होता. आरोपीला फाशी द्या तरच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातील असा ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. कल्याण पश्चिमेतील बैल बाजार स्मशानभूमीमध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार होते. मात्र कल्याण पूर्वमध्ये कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून हा निर्णय घेण्यात आला. यासाठी पोलिसाच्या कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.