Maharashtra Breaking LIVE : देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला - शरद पवार

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरामध्ये राज्याबरोबरच देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये घडलेल्या ताज्या घडामोडींवर अगदी संक्षिप्त स्वरुपात टाकलेली नजर एकाच क्लिकवर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता...

Maharashtra Breaking LIVE :  देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला - शरद पवार

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर 

26 Dec 2024, 16:41 वाजता

 सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांना आवाहन केले आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या शास्त्र परवान्यांची ताबडतोब चौकशी लावा. जिथे गरज नाही असे सगळे शास्त्र परवाने रद्द करा. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे गुंडांचा नाही अशी पोस्ट अंजली दमानिया यांनी केली आहे. 

26 Dec 2024, 15:53 वाजता

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौ-यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हेसुद्धा होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचीही भेट घेतली. 

26 Dec 2024, 15:52 वाजता

Maharashtra Breaking LIVE : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

26 Dec 2024, 15:02 वाजता

बीड आणि परभणीचा निषेध 29 डिसेंबरला भव्य मोर्चा काढणार - संजय राऊत 

बीड आणि परभणीचा निषेध करण्यासाठी 29 डिसेंबरला भव्य मोर्चा काढणार, असं संजय राऊत यांनी सांगितलंय. उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिला आठवड्यात बीड आणि परभणीचा दौरा करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. 2 किंवा 3 जानेवारीला उद्धव ठाकरे परभणी आणि बीडमध्ये जाऊन सूर्यवंशी आणि देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. बीड आणि परभणीतील एकीकडे तपास सुरू झालेला असताना या सगळ्या प्रकरणाची माहिती उद्धव ठाकरे त्या ठिकाणी जाऊन घेणार आहेत, अशीही माहिती संजय राऊत यांनी दिली 

 

26 Dec 2024, 14:58 वाजता

धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा- संजय राऊत

बीडमधील सरपंच हत्याकांडा प्रकरणी धनंजय मुंडे जबाबदार, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. एवढंच नाही तर अजित पवारांचाही राजीनामा घ्या, अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय. 

 

26 Dec 2024, 14:51 वाजता

संतापजनक घटना! परीक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थिनींकडे शरीर सुखाची मागणी 

एक धक्कादायक बातमी भंडा-यातून. परीक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थिनींकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप मुलींनी केलाय. भंडारा शासकीय महिला वैद्यकीय नर्सिंग कॉलेजमध्ये हा प्रकार घडलाय. पीडित मुलींनी पालकांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर संतप्त पालकांनी संबंधीत शिक्षकाला चोप दिला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन या शिक्षकाला अटक केलीये. 

 

26 Dec 2024, 14:47 वाजता

नराधमाला फाशीची शिक्षा, चित्रा वाघ यांचं आश्वासन

भाजप नेत्या चित्रा वाघ यांची कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याला भेट दिलीये. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केलेल्या नराधमाला फाशीची शिक्षा होणार असं आश्वासन त्यांनी दिलीये.आधीच्या विनयभंगांच्या गुन्ह्यात मनोरुग्णाचं सर्टिफिकेट न्यायालयात दाखवून त्याची जामिनावर सुटका झाली होती. मात्र आता त्याची सुटका होणार नाही. आणि त्याला खोटं प्रमाणपत्र देणा-या डॉक्टरला शोधून काढणार आणि मुख्यमंत्र्यांकडे याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचंही त्या म्हणाल्यात.

 

26 Dec 2024, 14:45 वाजता

कल्याणमधील पीडित मुलीच्या अंत्यविधी करण्यास नकार

कल्याणमधील पीडित अल्पवयीन मुलीच्या अंत्यविधीला स्थानिकांनी करण्यास नकार दिलाय. नराधम आरोपी विशाल गवळी याला जोपर्यंत फाशीची शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतलाय. कल्याण पश्चिमेतील बैल बाजार स्मशानभूमीमध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कल्याण पूर्वमध्ये कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पोलिसाच्या कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

 

26 Dec 2024, 14:43 वाजता

सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर 

पुण्यातल्या हडपसरच्या सतीश वाघ हत्याप्रकरणात मोठी माहिती समोर आलीय. एका आमदाराचा मामा असलेल्या सतीश वाघ यांची हत्या मामीनं घडवून आणलाय. पैसा, अधिकार आणि बॉयफ्रेंडच्या नादाला लागून मामीनं स्वतःच्याच कपाळाचं कुंकू पुसलंय. 

बातमी सविस्तर वाचा - बॉयफ्रेंडसाठी कुंकवाच्या धन्याला संपवलं! मामा, मामी आणि भाडेकरु; सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर

26 Dec 2024, 14:29 वाजता

संतोष देशमुखची हत्या करणाऱ्याला फाशी द्या - धनंजय मुंडे 

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी बीडच्या मस्साजोग प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला सोडू नका. त्याला थेट फासावर चढवा, असे ते म्हणालेत. धनंजय मुंडेंनी बीड सरपंच हत्याप्रकरणी होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तर दिलंय. माल्किम कराडांची सुरेश धस यांच्यासोबत जवळीक होती असंही धनंजय मुंडे म्हणालते. सरपंच हत्ये प्रकरणी आरोपी कुणीही असो त्याला फाशी देण्याची मागणीच त्यांनी केलीय. काही लोकांकडून माझ्याविरोधात मीडिया ट्रायल सुरू करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मला पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी काही लोकांनी आरोप केल्याचंही मुंडे म्हणालेत. धनंज मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतली.