Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर
26 Dec 2024, 13:08 वाजता
मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला
या क्षणाची राजकीय गोटातून मोठी बातमी समोर आलीय. मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आले आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर मुंडे फडणवीसांची बैठक सुरु आहे.
26 Dec 2024, 12:37 वाजता
पुणे पुन्हा एकदा हादरलं!
पुणे पुन्हा एकदा हादरलं! लोणावळ्याच्या पोलिसाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला रक्षकचं भक्षक बनला आहे. एका पोलीस शिपायाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केलेत.
बातमी सविस्तर वाचा - पुण्यात रक्षकच बनला भक्षक! पोलिसाकडून अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन...
26 Dec 2024, 12:30 वाजता
पंतप्रधान मोदी आणि शिंदेंमध्ये एक तास बैठक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि मोदींमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली. मोदींच्या निवासस्थानातून शिंदे कुटुंबीय आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले आहेत. आता अमित शाह यांच्यासोबत बैठक सुरु आहे.
26 Dec 2024, 12:27 वाजता
अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट, सूत्रांची माहिती
बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. याच लग्नसोहळ्यात 26 डिसेंबर रोजी त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात आल्याची माहिती स्वतः आमदार किणीकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथच्या स्वामीनगर आणि खुंटवली भागातून दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र याबाबत अद्याप आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि पोलीस या दोघांनीही अधिकृतपणे काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र या सगळ्यामुळे अंबरनाथमध्ये मोठी खळबळ माजली असून किणीकर हे लग्नसोहळा आटोपून परत आल्यानंतर शहरात वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.
26 Dec 2024, 11:22 वाजता
विशाल गवळीसह पत्नीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
नराधम विशाल गवळीला पत्नीसह कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलंय. कोर्टाने विशाल गवळीसह पत्नीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विशेष न्यायाधीश व्ही ए पत्रावळे यांच्या उपस्थितीत ही सुनावणी झाली. कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कल्याण सत्र न्यायालयात कडेकोट मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय. संपूर्ण कोर्टाला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय.
26 Dec 2024, 11:02 वाजता
कल्याण अत्याचार हत्या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला कोर्टात केलं हजर
नराधम विशाल गवळीला पत्नीसह कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलंय. विशेष न्यायाधीश व्ही ए पत्रावळे यांच्या उपस्थितीत सुनावणी होणार. कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कल्याण सत्र न्यायालयात कडेकोट मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय. संपूर्ण कोर्टाला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय.
26 Dec 2024, 09:48 वाजता
राजगुरुनगरमधील बेपत्ता मुलींची हत्या
एक ब्रेकिंग न्यूज राजगुरुनगर शहरातून.. राजगुरुनगरमध्ये काल दुपारी बेपत्ता झालेल्या दोन चिमुकल्यांची हत्या झालीये.. या दोघींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आलेत.. अशी या मुलींची नावं आहेत. काल दुपारी दोघी घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री राजगरुनगर शहरालगत एका इमारतीच्या बाजुला दोघींचे मृतदेह एका पिंपात सापडले.. हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आलेत. या मुलींसोबत काय झालं याचा पोलीस तपास करत आहेत.
बातमी सविस्तर वाचा - कल्याणनंतर पुणे हादरले! दोन सख्ख्या बहिणींचे छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह सापडले, घराच्या शेजारीच...
26 Dec 2024, 09:46 वाजता
उजनी धरणातून आज 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
बातमी सोलापुरातून. उजनी धरणातून आज भीमा नदीपात्रात 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा या शहरांना पाणी पुरवठा करण्यासाठी हे पाणी सोडण्यात येतंय. टप्प्याटप्प्यानं हा विसर्ग वाढवला जाणार आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नदीपात्रात कोणीही उतरु नये तसंच नदी पात्रातील कृषी पंप, नदीलगतच्या शेतांमधील अवजारे, इतर विद्युत साहित्य तात्काळ हटवावेत अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्यात.
26 Dec 2024, 09:45 वाजता
झी २४ तासचा दणका
राज्यातले सुमारे सव्वा तीन लाख बोगस पिक विमा प्रस्ताव रद्द केलेत. पिकांची प्रत्यक्ष लागवड न करता केवळ कागदोपत्री लागवड दाखवून भरपाई लाटण्याचा प्रकार काही शेतकऱ्यांकडून सुरू होता. कांद्यासह इतर अनेक पिकांचा बोगस पिक विमा उतरवण्यात आल्याबाबतच्या बातम्या झी 24 तास ने दिल्या होत्या. अशा गैरव्यवहार टाळण्यासाठी कृषी विभागाकडून काही जिल्ह्यांमध्ये तपासणीची प्रक्रिया राबवली गेली. त्यानंतर संशयास्पद ठरलेले तीन लाख बत्तीस हजार पीकविमा रद्द करण्यात आले. 2024 - 25 वर्षासाठी पीक विम्याचे दोन कोटी अकरा लाख अर्ज दाखल झालेत.
26 Dec 2024, 09:44 वाजता
कल्याणमधल्या अत्याचाराच्या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांकडून दखल
कल्याणमधल्या अत्याचाराच्या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली. ही घटना गंभीर आहे. विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवा,आरोपीला फाशी होईल, हे सुनिश्चित करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिस आयुक्तांना दिले.