Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर
26 Dec 2024, 09:42 वाजता
विशाल गवळी कल्याण क्राईम ब्रांचच्या ताब्यात
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणा-या आरोपीला कल्याण क्राईम ब्रांचनं ताब्यात घेतलंय. विशाल गवळी असं या आरोपीचं नाव आहे. त्याला ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलंय दुपारनंतर त्याला कल्याण कोर्टात हजर केलं जाणार आहे.
बातमी सविस्तर वाचा - 3 लग्न, 4 गुन्हे...; कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नीचा मोठा खुलासा, असा घडला भयानक प्रकार
26 Dec 2024, 09:40 वाजता
लसणाच्या दरात घसरण
लसणाच्या दरात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी प्रतिकिलो 50 रुपयांनी देरात घसरण झाली आहे. चांगल्या प्रतीचा लसूण 350 रुपयांनी विकला जात होता. तो आता 300 रुपयांवर आला आहे. बाजारात नवीन लसूण दाखल होताच दर आवाक्यात येतील, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
बातमी सविस्तर वाचा - लसणाचे दर... वर्ष संपता संपता गृहिणींसाठी महत्त्वाची बातमी
26 Dec 2024, 09:38 वाजता
पुण्यातील सतीश वाघ हत्याप्रकरणात मोठी अपडेट
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांच्या पत्नीनं दिलीये. पोलिसांनी केलेल्या तपासात पत्नीनं हत्येसाठी सुपारी दिल्याचं समोर आलंय. त्यावरून गुन्हे शाखेनं सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केलीये. सतीश वाघ यांची अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
बातमी सविस्तर वाचा - BJP आमदाराच्या मामाच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड समोर, घरातीलच व्यक्तीने केला विश्वासघात
26 Dec 2024, 09:37 वाजता
साताऱ्यातील सर्व ग्रामपंचायत बंद
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आज साताऱ्यातील सर्व ग्रामपंचायत बंद ठेवण्यात येणार आहे. तसा निर्णय सर्व ग्रामपंचायतीनं घेतलाय. तसेच आज साताऱ्यात रास्ता रोको करून संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध कऱण्यात येणार आहे . पत्रकार परिषद घेऊन नंतर सर्व ग्रामपंचायत सदस्य भूमिका मांडणार आहे.
26 Dec 2024, 09:34 वाजता
आरोपींना लवकरात लवकर अटक करा अन्यथा - जरांगे पाटील
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय. लवकरात लवकर आरोपीला अटक करा अन्यथा नाईलाजानं महाराष्ट्र बंद पाडण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय.
26 Dec 2024, 09:34 वाजता
अंजली दमानियांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर आरोप
बीडमधल्या सरपंच हत्येच्या पार्श्वभूमीवर सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर टीकेची झोड उठवली आहे. बीडमध्ये वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या छत्रछायेखाली दहशत पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
धनंजय मुंडे / वाल्मिक कराड / संदीप क्षीरसागर / सुरेश धस / पंकजा मुंडे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला छळुन
१. जमिनी बळकावल्या असतील
२. खंडणी मागितली असेल
३. कार्यकर्ते बंदूक दाखवून दहशत पसरवत असतील तर आमच्या ह्या नंबर वर कळवा.९२३५३५३५००
सगळी माहिती आणि माहिती…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 25, 2024
26 Dec 2024, 09:32 वाजता
मुंबईकरांचं पर्यटनाचं प्रमाण वाढलं
मुंबईकरांचं पर्यटनाचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे मुंबई ते श्रीनगर विमानाचे तिकीट दर 13 हजार रुपयांच्या घरात गेलंय. तर नववर्षाचे स्वागत करून मुंबईत परतण्यासाठी 20 हजार रुपये मोजावे लागणारेत.
26 Dec 2024, 09:30 वाजता
IITकडून गेट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी गेट परीक्षा 1 ते 16 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येणार आहे. IITकडून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. गेट परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्यही करण्यात येतं.
26 Dec 2024, 09:29 वाजता
मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच आहे. हवेची गुणवत्ता अद्याप सुधारलेली नाही. काही भागात ‘अतिवाईट’ तर, काही भागात ‘वाईट’ हवेची नोंद झाली. बोरिवलीतही बुधवारी सायंकाळी अतिवाईट हवेची नोंद झालीये. विषारी धुरक्याचे साम्राज्य कायम राहिल्याने अनेक नागरिकांनी काळजी घेत 'मास्क' वापरण्यास सुरुवात केलीये.
26 Dec 2024, 09:28 वाजता
मुंबईत पुन्हा थंडीत वाढ
मुंबईत पुन्हा थंडीचा कडाका वाढलाय. उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे कमाल आणि किमान तापमानात मोठी घट झालीयं. त्यामुळे हवेत गारवा पसरला. तर 31 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.