Leopard Cat Viral Video: खोडकर मांजराची अंतरंगी धमाल, मृत्यूच्या दारात बिबट्याशी मस्ती!

Leopard and Cat Viral Video: नाशिकमध्ये बिबट्या आणि मांजर (Cat) दोघंही आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करताना दिसून आले. त्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या व्हायरल होताना दिसतोय.

Updated: Feb 15, 2023, 04:09 PM IST
Leopard Cat Viral Video: खोडकर मांजराची अंतरंगी धमाल, मृत्यूच्या दारात बिबट्याशी मस्ती! title=
Nashik Leopard News

Leopard and Cat Viral Video:  नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात बिबट्याचे (Leopard) हल्ले सुरूच आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri), निफाड, येवला आदी परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्या दिसून येतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण दिसून येतं. नाशकात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली जाते. अशातच एक नाशकातून एक घटना समोर आली आहे.(leopard fell into well with cat while chasing in nashik marathi news Viral goes Video)

नाशकात एक बिबट्या मांजरीची शिकार करण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी तो तिचा पाठलाग करत होता पण पाठलाग करता करता तो आणि मांजर दोघेही विहिरीत पडले. त्यानंतर बिबट्या आणि मांजर (Cat) दोघंही आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करताना दिसून आले. त्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या व्हायरल होताना दिसतोय.

आणखी वाचा - Viral trending video : आणि म्हैस Nora Fatehi सारखी सेम नाचू लागली; व्हिडीओ पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

मांजरीचा पाठलाग करत असताना बिबट्या विहिरीत (leopard fell into well ) पडला. सिन्नर तालुक्यातील तेंबुरवाडी आशापूर येथील ही घटना आहे. मांजर विहिरीत पडली. त्यानंतर तिच्या मागे धावत असलेला बिबट्या देखील विहिरीत पडला. सकाळी लोकांना विहिरीत बिबट्या असल्याचं समजलं. त्यावेळी लोकांनी एकच गर्दी केली.

पाहा VIDEO - 

दरम्यान, विहिरीत पडल्यानंतर मांजर बिबट्याशी पंगा घेताना दिसत आहे किंवा मांजर जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. एका लोखंडी ग्रीलला धरून बिबट्याने जीव वाचवलाय. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी अथक प्रयत्न करून विहिरीत पडलेला बिबट्या आणि मांजराची जीव वाचवला आहे.