कोल्हापुरात आंदोलन करणाऱ्या महिलांनी पंचगंगा नदीत उड्या घेतल्या

मायक्रो फायनान्स कर्जमुक्तीसाठी कोल्हापुरात पूरग्रस्त महिलांचे आंदोलन चिघळले आहे. 

Updated: Jan 3, 2020, 05:25 PM IST
कोल्हापुरात आंदोलन करणाऱ्या महिलांनी पंचगंगा नदीत उड्या घेतल्या title=

कोल्हापूर : मायक्रो फायनान्स कर्जमुक्तीसाठी कोल्हापुरात पूरग्रस्त महिलांचे आंदोलन चिघळले आहे. कर्जमुक्तीसाठी आंदोलन करणाऱ्या महिलांनी शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या समोरच नदीत उड्या घेतल्या. त्यानंतर प्रशासन आणि उपस्थित लोकांची चांगलीच तारांबळ उडाली.  गेल्या तीन दिवसांपासून मायक्रोफायनान्सचे कर्ज माफ करण्यासाठी शिरोळ तालुक्यातील महिलांच पंचगंगा नदीत सुरू आहे. या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने गेले होते. यावेळी अचानक पूरग्रस्त्त्त महिलांनी थेट नदीमध्ये उड्या मारल्या. त्यामुळे एकच गोंधळ आणि धावपळ उडाळी.

कोल्हापूरमधील पूरग्रस्त महिलांच्या आर्थिक पिळवणुकीकडे स्थानिक प्रशासन लक्ष देत नाही, अशी वारंवार तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने महिला संतप्त झाल्या होत्या. काहीच कारवाई होत नसल्याने त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. त्यानंतर महिलांनी थेट पंचगंगा नदीमध्ये उडी घेतली. हातकणंगलेचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्यासमोरच हा प्रकार अचानक घडल्याने धावपळ उडाली. या महिलांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी धावपळ करावी लागली. अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी तातडीने नदीमध्ये उड्या घेत महिलांना पाण्यातून बाहेर काढले. दरम्यान, या सगळ्या प्रकारात एक महिला आंदोलक बेशुद्ध पडल्याने अधिकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

कोल्हापुरात आंदोलन करणाऱ्या महिलांनी पंचगंगा नदीत उड्या घेतल्या

आम्हाला न्याय मिळत नाही आणि जोपर्यंत मुख्यमंत्री आंदोलकांशी चर्चा करत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहिल, असा निर्धार या महिलांनी केला आहे. या महिलांनी मुख्यमंत्री यांनी कर्जमाफीचा आदेश काढण्याची मागणी केली आहे. आम्ही आंदोलनावर ठाम आहोत, असे आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या दिव्या मगदूम यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात शिवसेनेचे सरकार आहे. त्यामुळे येथील स्थानिक खासदार धैर्यशील माने यांनी या आंदोलक महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.