पादचाऱ्याला चुकवण्याच्या प्रयत्नात एसटी झाडावर आदळली, १ जण ठार तर २७ जखमी

 यामध्ये १ जण ठार तर २७ जण जखमी झाले 

Updated: Mar 16, 2020, 07:40 AM IST
पादचाऱ्याला चुकवण्याच्या प्रयत्नात एसटी झाडावर आदळली, १ जण ठार तर २७ जखमी title=

कोल्हापूर : पादचाऱ्याला चुकविण्याच्या प्रयत्नात एसटी बसचा झाडावर आदळून अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये १ जण ठार तर २७ जण जखमी झाले आहेत. कोल्हापूर जवळील कळंबा पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला. जखमींना उपचारासाठी कोल्हापुरातील सी.पी.आर हॉस्पिटलमध्ये हालविण्यात आले आहे.

 ही बस कोल्हापूरहुन गारगोटीला जात होती.