कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाचा सोहळा

अंबाबाईच्या मंदिरात गर्दी 

Updated: Nov 10, 2019, 09:01 AM IST
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाचा सोहळा title=

मुंबई : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाचा सोहळा पार पडला. किरणोत्सवाचा शनिवार हा पहिला दिवस होता. सायंकाळी 5 वाजून 11 मिनिटांनी सूर्यकिरण गरुड मंडपात आले. त्यानंतर 5 वाजून 36 मिनिटांनी सूर्यकिरणं पितळी उंबऱ्यापर्यंत आली. सूर्यकिरणं 5 वाजून 49 मिनिटांनी गर्भकुटीत येऊन देवीच्या चरणांवर स्थिरावली. त्यानंतर ही सूर्य किरणं डाव्या बाजूनं सरकत कंबरेवर येऊन लुप्त झाली. मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली. 

देवस्थान समितीने जाहीर केलेल्या तारखांनुसार किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी ढगांच्या अडथळ्यामुळे किरणे दुसऱ्या पायरीपर्यंत पोहोचली होती. मात्र शनिवारी सायंकाळी आकाश निरभ्र राहिल्याने सूर्यकिरणांचा अपेक्षित प्रवास झाला. 

वर्षातून दोन वेळा होणाऱ्या अंबाबाई देवीच्या किरणोत्सव मार्गात मानवनिर्मित अडथळे मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. त्यामुळे ते दूर करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सातत्याने प्रयत्नशील आहे.