Crime News : केलेला खर्च वसूल करण्यासाठी तरुणाकडून प्रेयसीच्या मुलाचं अपहरण, आणि पुढे...

Crime News : तुळजापुरात तरुणाकडून प्रेयसीच्या मुलाचं अपहरण ( Son Kidnapping) करण्यात आले. (Tuljapur Police) मात्र, हे अपहरण चक्क प्रेयसीवर केलेला खर्च वसूल करण्यासाठी केले गेले. 

Updated: Feb 4, 2023, 01:34 PM IST
Crime News : केलेला खर्च वसूल करण्यासाठी तरुणाकडून प्रेयसीच्या मुलाचं अपहरण, आणि पुढे... title=
Tuljapur Crime News

Tuljapur Crime News : एक धक्कादायक बातमी. तुळजापुरात तरुणाकडून प्रेयसीच्या मुलाचं अपहरण ( Son Kidnapping) करण्यात आले. (Tuljapur Police) मात्र, हे अपहरण चक्क प्रेयसीवर केलेला खर्च वसूल करण्यासाठी केले गेले. (Crime News) तरुणाने मुलाच्या सुटकेसाठी दोन लाखांची मागणी केली. दरम्यान, याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर पोलिसांनी चौवीस तासात आरोपीसह साथीदारांना अटक केली.

.प्रेयसीवरील केलेला खर्च वसूल करण्यासाठी एका तरुणानं चक्क प्रेयसीच्या मुलाचं अपहरण केलं. धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. प्रेयसीच्या मुलाच्या बदल्यात आरोपीनं तिच्याकडे दोन लाख रुपये खंडणी मागितली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी किरण लादे या तरुणासह त्याच्या साथीदारांना सांगली जिल्ह्यातून अटक केली. आणि त्यांच्या तावडीतून अपहरण करण्यात आलेल्या मुलाची सुटका करण्यात आली आहे.

नेमका काय आहे ही घटना?

किरण लादे या तरुणाचे अपहरण करण्यात आलेल्या मुलाच्या आईसोबत अनेक वर्षातूनपासून प्रेमसंबंध होते. आणि संबंधातून ते एकत्र राहत होते. किरण लादे हा तिच्या  प्रेयसीवर म्हणजेच अपहरण केलेल्या मुलाच्या आईवर मोठ्या प्रमाणात खर्च करत होता. त्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता. दरम्यान काही दिवसापूर्वी किरण लादे आणि त्याच्या  प्रेयसीचे खटके उडाले आणि दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन ते वेगळे राहत होते. 

याचा त्याला राग आला. प्रेयसीवर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करुन देखील ती आपल्याला सोडून गेली, याचा राग मनात धरून आरोपीने चक्क आपल्या साथीदाराच्या मदतीने तिच्या मुलाचे अपहरण केले. त्यानंतर दोन लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली. मुलगा गायब झाल्याने आईने आणि तिच्या नातेवाईकांनी नळदुर्ग पोलिसांमध्ये तक्रार दिली. 

नळदुर्ग पोलिसांनी घटनेचे गांभीरे ओळखत आपले सूत्र हलवली.  पोलिसांनी दोन पथक तयार करत सांगली मोबाईलच्या लोकेशनवरून सांगली आणि सोलापूरमध्ये तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि अपहरण केलेल्या मुलाला ताब्यात घेऊन तिच्या आईच्या स्वाधीन केले, अशा माहिती तुळजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे आणि तपास अधिकारी सिद्धेश्वर गोरे यांनी दिली.