Kalyan Rape- Murder Case: विशाल गवळीला कोर्टातच कोसळलं रडू; पोलिसांना म्हणाला, 'मला फक्त एकदाच...'

Kalyan Rape- Murder Case: कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथील एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकरी विशाल गवळी (Vishal Gawli) आणि त्याची पत्नी साक्षी (Sakshi Gawali) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 4, 2025, 12:31 PM IST
Kalyan Rape- Murder Case: विशाल गवळीला कोर्टातच कोसळलं रडू; पोलिसांना म्हणाला, 'मला फक्त एकदाच...' title=

Kalyan Rape- Murder Case: कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथील एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकरी विशाल गवळी (Vishal Gawli) आणि त्याची पत्नी साक्षी (Sakshi Gawali) यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने आज न्यायालयात हजर करण्यात आलं. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान कोर्टाने कोठडी सुनावताच विशाल गवळी कोर्टात रडू लागला होता. 

आरोपी विशाल गवळीने आपला मोबाईल बुलढाणा येथील एका लॉज मॅनेजरला 5 हजारात विकला असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली आहे. ज्या बॅगेतून मृतदेह बापगाव परिसरात टाकला होते ती बॅग अजूनही सापडलेली नाही अशी माहितीही देण्यात आली आहे. आणखी तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती. दरम्यान आरोपीला 9 दिवस पोलीस कोठडी मिळाली होती, सर्व दस्तावेज मिळाले आहे त्यामुळे आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळावी असा युक्तिवाद आरोपी विशाल गवळीचे वकील अँडवोकेट संजय धनके यांनी केला. 

 

पोलिसांनी 2 जानेवरीला विशाल गवळी आणि साक्षी गवळीला पोलीस कोठीडीची आठ दिवसांची मुदत संपल्याने कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केलं होते. यावेळी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज हजर करण्यात आलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयाने कोठडी सुनावताच विशाल गवळीला कोर्टातच रडू कोसळलं. यावेळी विशाल गवळीने पोलिसांकडे मला एकदा पत्नीला भेटू द्या अशी विनंती केली. 

कल्याणमधील नेमकी घटना काय?

विशाल गवळीने 23 डिसेंबर या दिवशी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिची हत्या केली. या मुलीचा मृतदेह 24  डिसेंबरला कल्याण जवळच्या बापगाव भागात आढळला होता. 

पोलिसांनी तपास केला असता कोळसेवाडीतून ती बेपत्ता झाल्याचं आढळलं होतं. पोलिसांनी विशाल गवळीची पार्श्वभूमी पाहता त्याच्या पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेली विशालने मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचं उघडं झालं. विशालने अपहरण करुन मुलीला आपल्या घरी नेलं आणि अत्याचार करुन तिची हत्या केली. यानंतर मृतदेह मोठ्या बॅगेत लपवला होता. 

7 वाजता बँकेत काम करणारी पत्नी घरी आली असता, विशालने तिला सगळा प्रकार सांगितला. यानंतर तिने पतीचा गुन्हा लपवण्यासाठी मदत करण्याचं ठरवलं. दोघांनी विल्हेवाट कशी लावायची याची योजना आखली. घरातील रक्ताचे डाग पुसल्यानंतर त्यांनी मित्राची रिक्षा बोलावली. यानंतर रात्री 9 वाजता रिक्षाने मृतदेह घेऊन बापगावला गेले. तेथून परतत असताना विशालने आधारवाडी चौकात दारुची बाटली विकत घेतली आणि पत्नीच्या गावी शेगावला गेला. साक्षी मात्र घऱी परतली होती.