भारतीय सैन्याचे हॅलीकॉप्टर क्रॅश, दोन्ही पायलट सुरक्षित

जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्याजवळ भारतीय सेनेचे एक हॅलीकॉप्टर क्रॅश

Updated: Feb 3, 2020, 07:43 PM IST
भारतीय सैन्याचे हॅलीकॉप्टर क्रॅश, दोन्ही पायलट सुरक्षित  title=

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्याजवळ भारतीय सेनेचे एक हॅलीकॉप्टर क्रॅश झाले आहे. या हॅलीकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत.रियासी येथील माहोरमधील रुद नाला येथे ही दुर्घटना घडली. यामध्ये भारतीय सेनेचे 'चीता' हॅलीकॉप्टर क्रॅश झाले. 

'चीता' चॉपरने उधमपूर येथून प्रशिक्षणाच्या हेतून उड्डाण केल्याची माहीती सैन्य दलाकडून देण्यात आली. या घटनेची अधिक चौकशी सुरु आहे. हिंदुस्थान एअरोनॉटीक्स लिमिटेड (HAL) ने परवान्या सहित बनवलेले चीता हॅलीकॉप्टर हे डिसेंबर १९७३ पासून भारतीय सैन्य दलाच्या सेवेत आहे. भारतीय वायु सेनेमार्फत देखील चीता हॅलीकॉप्टर उडविले जात असते. 

मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह आणि सैन्य अधिकाऱ्यांना नेणाऱ्या हॅलीकॉप्टरमध्ये देखील तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे त्याची तात्काळ लॅंडीग करण्यात आली होती. 

टॉप हेडलाईन्स

भरचौकात शिक्षिकेला जाळलं, घटनेविरोधात विद्यार्थिनींचा आक्रोश

कोरोना व्हायरसची ज्याला लागण झाली त्याचा मृत्यू अटळ?

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अफलातून अभिनय,विनोदाचं टायमिंग एकदा पाहाच....

लोणीकरांनी 'हिरॉईन' उल्लेख केलेल्या महिला तहसीलदार सुट्टीवर

कुणाल कामरा राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर