भरचौकात शिक्षिकेला जाळलं, घटनेविरोधात विद्यार्थिनींचा आक्रोश

आरोपीला कठोर शिक्षेची मागणी

Updated: Feb 3, 2020, 07:44 PM IST
भरचौकात शिक्षिकेला जाळलं, घटनेविरोधात विद्यार्थिनींचा आक्रोश title=

वर्धा : हिंगणघाटमधली सकाळच भयानक उजाडली. सकाळी साडे सात वाजता भर चौकात एका शिक्षिकेला पेटवून देण्यात आलं. हे भयानक कृत्य करणाऱ्या नराधमाचं नाव आहे विकेश नगराळे. ती शिक्षिका कुठून येणार, हे विकेशला माहीत होतं. विकेश हा त्या तरुणीच्या गावातलाच आहे. तो एका हातात पेट्रोलचा डबा आणि एका हातात जळती काठी घेऊन उभा होता. ती येताच त्यानं तिच्या अंगावर पेट्रोल टाकलं. त्यामध्ये ती ३० टक्क्यांवर जळली. तिची प्रकृती प्रचंड चिंताजनक आहे. त्या मुलीची दृष्टी आणि वाचाही जाऊ शकते. सध्या या तरुणीवर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती अक्षरशः मृत्यूशी झुंज देते आहे.

एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. जे घडलं ते अंगावर काटा आणणारं होतं. या संतापजनक घटनेच्या निषेधात वर्ध्यात शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी मोर्चा काढला. आता या घटनेविरोधात मोर्चे निघतील, आंदोलनं होतील, राजकारणही होईल. पण पुन्हा भर चौकात मुलीला जाळण्याची हिंमत होणार नाही. अशी जरब बसणार कधी?

टॉप हेडलाईन्स

भरचौकात शिक्षिकेला जाळलं, घटनेविरोधात विद्यार्थिनींचा आक्रोश

कोरोना व्हायरसची ज्याला लागण झाली त्याचा मृत्यू अटळ?

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अफलातून अभिनय,विनोदाचं टायमिंग एकदा पाहाच....

लोणीकरांनी 'हिरॉईन' उल्लेख केलेल्या महिला तहसीलदार सुट्टीवर

कुणाल कामरा राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x