नाशिकमध्ये कांदा व्यापा-यांवर आयकर विभागाच्या धाडी

आज सकाळ आयकर विभागानं नाशिक जिल्ह्यातल्या कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या. 

Updated: Sep 14, 2017, 03:45 PM IST
नाशिकमध्ये कांदा व्यापा-यांवर आयकर विभागाच्या धाडी title=

नाशिक : आज सकाळ आयकर विभागानं नाशिक जिल्ह्यातल्या कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या. 

कांद्याच्या साठेबाजी भाववाढ आणि अचानक होणारे चढउतार तपासले. गेल्या दोन महिन्यांपासून आयकर विभागाचे अधिकारी कांद्याची आवक, खरेदी,विक्री यासगळ्यावर नजर ठेवून होते.

लासलगाव बाजारसमितीतील कांदा व्यापा-यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्याने व्यापारी संतप्त झालेत. त्यामुळे बाजार समितीमधील व्यवहार ठप्प झालेत.