मुंबईसह या जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट, पुढचे 3 दिवस काळजीचे

सावधान सूर्यदेवा आग ओकणार, पुढचे 3 दिवस काळजीचे

Updated: Mar 14, 2022, 03:53 PM IST
मुंबईसह या जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट, पुढचे 3 दिवस काळजीचे title=

मुंबई : मुंबई, ठाण्यात उन्हाचा चटका कमालीचा वाढलाय. मुंबईत कमाल तापमान ३८ अशांवर पोहोचलं आहे. किमान तापमानही २३ अंशांवर आहे. कमाल तापमानात सोमवारीही वाढ कायम राहणार आहे. 

डहाणूमध्येही 38 अंशांवर पारा गेला आहे. कमाल तापमानात सरासरी 7 अंशांची वाढ झाली. समुद्र किनारी भागात कमाल तापमान 37 अंशांच्या पार जाणं हा उष्णतेच्या लाटेचा पहिला निकष आहे. 14 आणि 15 मार्चला मुंबई,ठाण्यासह संपूर्ण उत्तर कोकणात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 

14 मार्च दक्षिण कोकणात तीव्र उष्णतेच्या लाटेचा तर 15 मार्चला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 16 मार्च संपूर्ण कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा. काळजी घ्या, IMD ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. 

मुंबई उष्णतेच्या लाटेचे स्पष्टीकरण: येत्या 2 दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान 39 डिग्री राहिल व नंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता. कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष: कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 4.5°C वर व कमाल तापमान किमान 37 डिग्री सेल्सियस असावे असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.