गृहिणींच 'किचन बजेट' कोलमडणार, भाज्यांचे दर गगनाला भिडले

कांदा, टोमॅटोनंतर भाज्यांच्या दरात वाढ 

Updated: Oct 19, 2019, 07:36 AM IST
गृहिणींच 'किचन बजेट' कोलमडणार, भाज्यांचे दर गगनाला भिडले  title=

मुंबई : ऑक्टोबर महिन्याचे 15 दिवस उलटूनही पाऊसस पूर्णपणे गेलेला नाही. याचा परिणाम भाज्यांच्या दरांवर पाहायला मिळत आहे. भाजी मंडईत कांदा, टोमॅटो पाठोपाठ आता भाज्यांचे दर देखील गगनाला भिडले आहेत. कांदा आणि टोमॅटोचे दर थोडे कमी होत नाहीत तोच भाज्यांचे दर वाढला आहेत. 

दिल्ली, मुंबई, पटनासह भारतभर भाज्यांच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. आता भाज्यांच्या दरात इतकी वाढ झाली आहे की, ग्राहकांना या हिरव्या भाज्या देखील 'लाल' दिसायला लागल्या आहेत. सध्या भाजी मंडईत भाजीचा दर हा 60 ते 100 रुपये किलो असा आहे. भाज्यांचा हा दर बघून ग्राहक आवश्यक आणि गरजेपुरतीच भाजी घेत आहेत. महत्वाचं म्हणजे ग्राहक पाव किलोच भाजी घेणं पसंत करत आहेत. 

लसूण देखील महागला असून महिलांना स्वयंपाकघरात खूप अडचण होत आहे. सगळ्या पदार्थांमध्ये कांदा, टोमॅटो आणि लसूण या लागणाऱ्याच गोष्टी आहेत. यांच्याच दरात वाढ झाल्याने किचनचं बजेट कोलमडलं आहे. भाजीच्या दरात सप्टेंबर महिन्यापेक्षा 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

कांदा, टोमॅटो आणि लसूणचा दर 

कांदा आणि टोमॅटोच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाटी सरकारने खूप प्रयत्न केले पण तरीदेखील कांदा 50 रुपये किलोने विकला जात आहे. तर टोमॅटो 60 ते 80 रुपये किलोने विकला जात आहे. लसूण 250 ते 300 रुपये प्रती किलो आहे. 

दोन महिन्यांपूर्वी महिला भाजी खरेदीला जिथे 500 रुपये मोजत होते. तिथे आता 1000 रुपये लागतात. भाज्यांच्या दरात वाढ झाल्याने किचन बजेट पूर्णपणे बिघडलं आहे. बटाट्याच्या दरातही वाढ झाली आहे. कोबी, दुधी, पडवल आणि इतर भाज्यांच्या दरात वाढ होत आहे. 

अचूने पावसाने पूर्णपणे निरोप न घेतल्यामुळे कोथिंबीर, पुदीना या मसाल्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. याचा परिणाम हॉटेल किंवा छोटा खाद्य व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर होत आहे. अनेकांनी 1 ऑक्टोबरपासून दरात देखील वाढ केली आहे.