HSC Exam 2022 | आजपासून 12 वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा; बोर्डाकडून नियमावली जारी

HSC Board Exam : आजपासून 12 वीच्या (HSC Board Exam) ऑफलाईन पद्धतीने परीक्षा सुरू होणार आहे.

Updated: Mar 4, 2022, 09:41 AM IST
HSC Exam 2022 | आजपासून 12 वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा; बोर्डाकडून नियमावली जारी title=

पुणे : HSC Board Exam : आजपासून 12 वीच्या (HSC Board Exam) ऑफलाईन पद्धतीने परीक्षा सुरू होणार आहे. पुण्यातील परीक्षा केंद्रावर मुलांचे  स्वागत केलं जात आहे. (Maharashtra Board (MSBSHSE)Higher Secondary Certificate). गेल्या 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच होत ऑफलाईन परीक्षा होत असल्याने परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात येत आहे. परीक्षेसाठी बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी काही नियम जारी करण्यात आले आहे.

कोविड-19 च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, राज्य बारावीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

परीक्षा केंद्रामध्ये बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंमध्ये मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरण, हेडफोन आणि इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा समावेश आहे.

परीक्षेला राज्यातून 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा 9 हजार 635 ठिकाणी होणार आहे.

बारावीची परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून पहिले सत्र सकाळी 10.30 ते दुपारी 2 तर दुसरे सत्र दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत होणार आहे.