400 जणांचं ऑनलाइन धर्मांतर करणारा ठाणे पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? 'ती' एक चूक पडली महागात

Online Gaming Conversion Case: गेमिंग अॅपच्या (Gaming App) माध्यमातून 400 जणांचं धर्मांतर (Conversion) करणारा आरोपी शाहनवाज खान उर्फ बड्डू याला ठाणे पोलिसांनी (Thane Police) अटक केली आहे. एका सीम कार्डमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याने नुकतंच हे सीम कार्ड खरेदी केलं होतं. पोलिसांनी लोकेशन तपासलं असता तो रायगड (Raigad) जिल्ह्यात असल्याचं पोलिसांना आढळलं.   

शिवराज यादव | Updated: Jun 12, 2023, 04:47 PM IST
400 जणांचं ऑनलाइन धर्मांतर करणारा ठाणे पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? 'ती' एक चूक पडली महागात title=

Online Gaming Conversion Case: गेमिंग अॅपच्या (Gaming App) माध्यमातून 400 जणांचं धर्मांतर (Conversion) करणारा आरोपी शाहनवाज खान उर्फ बड्डू याला ठाणे पोलिसांनी (Thane Police) अटक केली आहे. रायगड जिल्ह्यातून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे. तपासादरम्यान पोलिसांना त्याने नुकतंच एक सीम कार्ड खरेदी केल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी लोकेशन तपासलं असता तो रायगड (Raigad) जिल्ह्यात असल्याचं आढळलं. 

पोलिसांनी सीम कार्ड पुरवठा करणाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. त्याने शाहनवाज खानला नवं सीम कार्ड देताना कोणती कागदपत्रं घेतली होती की नाही याची तपासणी पोलीस करत आहेत. पोलिसांना शाहनवाजचं लोकेशन पोलिसांना मिळालं, तेव्हा ठाणे पोलिसांच्या दोन टीम 10 जूनच्या रात्री अलिबागसाठी रवाना झाल्या. 11 जून रोजी पोलिसांनी पहाटे 3 ते 11.30 वाजेपर्यंत अलिबागमधील वेगवेगळे लॉज आणि कॉटेजमध्ये जाऊन तपासणी केली. 

यानंतर अखेर पोलिसांना शाहनवाज आणि त्याचा भाऊ एका लॉजमध्ये लपले असल्याची माहिती मिळाली. दोघेही नावं बदलून राहत होते. नंतर पोलिसांनी लॉजमध्ये जाऊन त्यांना अटक केली.

ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाजियाबाद पोलिसांनी ऑनलाइन धर्मातरणाचं हे रॅकेट उघड केल्यानंतर शाहनवाज फरार झाला होता. 31 मे पासून तो सतत जागा आणि नावं बदलत होता. दरम्यान, ठाणे पोलिसांना आधी शाहनवाज मुंबईतील वरळीत असल्याचं लोकेशन मिळालं होतं. पण पोलीस पोहोचण्याआधी तो फरार होण्यात यशस्वी झाला होता. 

नेमकं प्रकरण काय?

शाहनवाज आणि एका मौलवीवर उत्तर प्रदेशात बेकायदेशीर धर्म परिवर्तन प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी एका मुलाला इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार केल्याचा आरोप आहे. मुलाने नुकतीच 12 वी बोर्डाची परीक्षा दिली होती आणि त्याच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती.

पोलिस चौकशीदरम्यान, शाहनवाज याचं डिजिटल नाव 'Baddo' होतं अशी माहिती मिळाली. त्याने पोलिसांना सांगितलं की, की मुलगा 2021 मध्ये 'Fortnite' नावाच्या गेमिंग अॅपवर भेटला होता. यानंतर दोघे 'Discord' नावाच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बोलू लागले आणि नंतर फोनवरुन एकमेकांशी संपर्क साधला.

दोघांनी ऑनलाइन गेम खेळणे काही काळ थांबवलं होतं. परंतु नंतर 'Valorant' नावाच्या दुसऱ्या अॅपवर गेमिंग खेळणं पुन्हा सुरु केलं होतं.तेव्हाच दोघांनी धर्मांतराबद्दल बोलायला सुरुवात केली होती. यावेळी त्यांची वादग्रस्त इस्लामी धर्मोपदेशक झाकीर नाईक यांच्याबाबतही चर्चा झाली.

वडिलांनी तक्रारीत दावा केला होता की, त्यांचा मुलगा इस्लाम धर्म स्वीकारण्याकडे झुकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहनवाजने खात्री पटवन दिल्यानंतरच आपण इस्लाम धर्म स्वीकारल्याचे मुलाने वडिलांना सांगितले होते.