पालघर: समुद्रातल्या अजस्त्र लाटांनी पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी समुद्रकिनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला भगदाड पडलं आहे. समुद्राच्या उधाणाचं पाणी गावामध्ये शिरत असल्यानं गावकरी भयभीत झाले आहेत. लाल फितीमध्ये अडकलेली जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती आणि नवीन बंधाऱ्याच्या उभारणीचं काम, यामुळे ही आपत्ती ओढवली असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
सातपाटी इथे २००२ मध्ये, धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात आला. तत्कालीन खासदार राम नाईक यांच्या प्रयत्नाने आणि पुढाकाराने काम झालं. कालांतराने बंधाऱ्याची लांबी वाढवण्यात आली. मात्र अठराशे मीटरचा हा बंधारा समुद्राच्या अजस्त्र लाटांच्या तडाख्यामुळे सुमारे १० मीटर किनाऱ्याच्या बाजूने सरकला असून, या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला ४ ते ५ ठिकाणी मोठी भगदाडं पडली आहेत. यामुळे सातपाटी गावातल्या अनेक घरांना धोका निर्माण झाला असून, समुद्रातली घाण, चिखल, प्लास्टिक पाण्यासोबत वाहून येत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
सातपाटी दांडा भागात ६०० मीटरचा नव्याने बंधारा बांधण्यासाठी साडे सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी, सर्वोच्च न्यायालयातल्या प्रलंबित खटल्यामुळे या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. या बंधाऱ्याची डागडुजी करण्याचं आश्वासन बहुतांश राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी दिलंय. मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सातपाटीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आपत्कालीन निधीमधून तातडीनं रक्कम देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पालघर जिल्ह्यातील सातपाटी समुद्रकिनार्यावर बांधण्यात आलेल्या धूपप्रतिबंधक बंधार्याला भगदाड पडल्याने समुद्रातील उधाणाचे पाणी गावामध्ये शिरत असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत.
जुन्या बंधार्याची दुरुस्ती, नवीन बंधार्याची उभारणी लाल फितीमध्ये अडकलेली असताना राजकीय मंडळी व स्थानिक नेत्यांच्या पोकळ आश्वासनाची खैरात वाटली जात असून बाधीत नागरिकांनी उभारलेल्या वाळूनी भरलेल्या गोणीच समुद्राचे हे आक्रमण थोपवून ठेवेल यावर गावकर्यांची भिस्त राहिली आहे. तत्कालीन खासदार राम नाईक यांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने सन २००२ मध्ये सातपाटी येथे धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात आला. त्यामध्ये कालांतराने बंधार्याची लांबी वाढविण्यात आली. १८०० मीटरचा हा बंधारा समुद्राच्या लाटांच्या तडाख्यामुळे सुमारे १० मीटर किनार्याच्या बाजूने सरकला असून या धूप प्रतिबंधक बंधार्याला ४-५ ठिकाणी मोठी भगदाडे पडली आहेत. यामुळे गावातील अनेक घरांना धोका संभवत असून समुद्रातील घाण, चिखल, प्लॅस्टिक पिशव्या पाण्यासोबत वाहत येत असल्याने आरोग्याची समस्या निर्माण होत आहे.
सातपाटी दांडा भागात ६०० मीटरचा नव्याने बांधण्यासाठी ६.५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित केसमुळे या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. या बंधार्याची डागडुजी करण्यात यावी यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन बहुतांश राजकीय पक्षांच्या पुढार्यांनी दिले असले तरी याप्रकरणी प्रत्यक्षात काही उतरताना दिसत नाही, लाटांमुळे विखरलेली दगड एकत्र करून बंधार्यावर रचण्याचे काम स्थानिक पातळीवर केले जात असले तरी ते पुरेसे नसल्याचे दिसून आले आहे. सातपाटीच्या बंधार्याच्या दुरुस्तीसाठी आपत्कालीन निधीमधून रक्कम तातडीने देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.