नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत होती. नाशिक लोकसभा मतदारसंघातून समीर भुजबळ आणि हेमंत गोडसे आमने-सामने होते. वंचित बहुजन विकास आघाडीने पवन पवार यांना उमेदवारी दिली होती. नाशिकमध्ये भाजपचे ३, शिवसेनेचे २ तर काँग्रेसचा एक आमदार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये युतीला फायदा होऊ शकतो.
-नाशिकमधून हेमंत गोडसे आघाडीवर
-समीर भुजबळ पिछाडीवर
- दुसऱ्या फेरीत समीर भुजबळ आघाडीवर
-नाशिकमध्ये हेमंत गोडसे आघाडीवर
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना ४,९४,७३५ मते तर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांना ३,०७,३९९ मते आणि मनसेच्या डॉ. प्रदीप पवार यांना ६३,०५० मते मिळाली होती.