रत्नागिरी-सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, शेतीचे मोठे नुकसान

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. 

Updated: Oct 26, 2019, 06:33 PM IST
रत्नागिरी-सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, शेतीचे मोठे नुकसान title=

रत्नागिरी : अरबी समुद्रातलं 'क्यार' चक्रीवादळ पश्चिम दिशेला सरकले असले तरी याचा परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. समुद्राच्या पातळीत वाढ झाली आहे. सिंधुदुर्गात अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. पावसाने शेतीच मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका मालवण आणि देवगड तालुक्याला बसला आहे. 

ऐन दिवाळीत पावसाचा हाहाकार सुरू असल्यानं लोक हवालदिल झालेत. मालवणमधले अनेक रस्ते सकाळी पाण्याखाली आहे. पाऊस थोडासा ओसरला असला तरी जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. कोकण किनाऱ्यावर वादळी वारे वेगाने वाहत आहेत. 'क्यार' चक्रीवादळाचे केंद्र रत्नागिरीपासून पश्चिमेला १९० किलोमीटरवर अरबी समुद्रात होते. 

पुढील २४ तासांत चक्रीवादळ थोडे उत्तरेकडे सरकून कोकण किनारपट्टीच्या विरुद्ध दिशेला वळण घेईल. पुढील पाच दिवस क्यार चक्रीवादळ ओमनच्या दिशेनं अरबी समुद्रातून प्रवास करणार असून, या काळात त्याची तीव्रता एकदम तीव्र चक्रीवादळापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.