भाजप मंत्री-आमदारांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बौद्धीक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आज भाजप मंत्री व आमदारांचे आज  रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात  यांचे बौद्धीक  घेण्यात येणार आहे. 

Updated: Dec 20, 2017, 08:57 AM IST
भाजप मंत्री-आमदारांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बौद्धीक title=

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आज भाजप मंत्री व आमदारांचे आज  रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात  यांचे बौद्धीक  घेण्यात येणार आहे. 

संघ विचारधारेची माहिती 

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाकरीता राज्य सरकार नागपुरात असताना  गेल्या तीन वर्षांपासून संघातर्फे आमदार व मंत्र्यांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी त्यांना संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघ विचारधारा आणि सामाजिक क्षेत्रात कार्याबाबत माहिती देण्यात येते. गुजरात निवडणुकींच्या निकालनंतर होत असलेल्या या बौद्धिक वर्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित राहणार आहेत.

संघ पदाधिकाऱ्यांकडून शाळा

यावेळी आमदार व मंत्री रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात जाऊन आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी  यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर महर्षी व्यास सभागृहात सर्वांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.