काँग्रेस आमदार मुक्कामी असणाऱ्या जयपूरधील हॉटेलचा एका दिवसाचा खर्च माहितीये?

एका दिवसाचं भाडं ऐकून व्हाल अवाक्

Updated: Nov 12, 2019, 12:16 PM IST
काँग्रेस आमदार मुक्कामी असणाऱ्या जयपूरधील हॉटेलचा एका दिवसाचा खर्च माहितीये?  title=
छाया सौजन्य- yatra.com

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर फोडाफोडीचं राजकारण होऊ नये, यासाठी शिवसेनेकडून शक्य त्या सर्व परिंनी प्रयत्न केले गेले. मुंबईतील एका आलिशान ह़ॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांना ठेवण्यात आलं. तर, दुसरीकडे काँग्रेसही या बाबतीच मागे राहिलं नाही. आपल्या पक्षातील आमदारांसोबत फोडाफोडीचं राजकारण टाळण्यासाठी काँग्रेसने आमदारांना थेट महाराष्ट्राबाहेर, म्हणजेच काँग्रेस प्रशासित राज्यात अर्थात राजस्थानमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं आहे. 

महाराष्ट्रातील राजकीय पटलावरचे पेच सुटत नसले तरीही त्या दिशेने होणाऱ्या हालचाली मात्र अनेकांचं लक्ष वेधत आहेत. या साऱ्यापासून आपल्या आमदारांना दूर ठेवत काँग्रेसने त्यांना एक आकर्षक सुविधांनी परिपूर्ण अशा Buena Vista Resortsमध्ये ठेवलं आहे. 

'इंडिया टुडे'च्या माहितीनुसार काँग्रेसने आमदारांना  Buena Vista Resorts या शांततापूर्ण वातावरणातील पंचतारांकित रिसॉर्टमध्ये ठेवलं आहे. जयपूर- दिल्ली महामार्गापासून हा रिसॉर्ट दीड किलोमीटर अंतरावर आहे. 

सुविधांनी परिपूर्ण रिसॉर्ट 

 Buena Vista Resortsमध्ये बऱ्याच अत्याधुनिक आणि लक्षवेधी सोयी आहेत. येथे ५० खासगी व्हिला आहेत. ज्यामध्ये प्रत्येक व्हिलाला एज जलतरण तलाव म्हणजेच स्विमिंग पूल देण्यात आला आहे. त्याशिवाय दोन रेस्टॉरंट, दोन बार आणि स्पा, जिथे पाहुणेमंडळी निवांत बसू शकतात या सुविधाही आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार या रिसॉर्टची मालकी एका फ्रेंच राजकीय नेत्याकडे आहे. परिणामी येथील निर्मिती आणि सजावटीमध्ये भारतीय, विशेषत: राजस्थानी आणि फ्रेंच संस्कृती आणि कलाकुसरीचे परिणाम पाहायला मिळतात. 

 Buena Vista Resortsच्या अधिकृत संकेतस्थळावर एक भेट दिल्यास इथेही काही आकर्षक गोष्टी लक्ष वेधतात. खासगी स्विमिंग पूल असणारा गार्डन व्हिला, बेस कॅटेगरी व्हिला (किंमत- एक दिवस २४ हजार रुपये - १८ टक्के कर वगळून), खासगी स्विमिंग पूलसह हेरिटेज व्हिला (एक दिवस २५ हजार रुपये) असे व्हिला उपलब्ध आहेत. 

Buena Vista Resortsमध्ये टॉप-एण्ड कॅटेगरी या प्रवर्गात खासगी स्विमिंग पूरसह रॉयल एक्झेक्युटीव्ह व्हिला देण्यात आला आहे. ज्याच्यासाठी एका दिवसाचं भाडं म्हणून १ लाख २० हजार रुपये आकारण्यात येतात. अत्यंत आलिशान अशा या व्हिलामध्ये बऱ्याच सुविधा देण्यात आल्या आहेत ज्यांवर विश्वासही बसणार नाही. 

मुख्य म्हणजे या  Buena Vista Resortsच्या अधिकृत संकेतस्थळावर येथील व्हिलाच्या उपलब्धतेसाठी कोणत्याची माहितीची विचारणा केल्यास सर्व व्हिला बुक असल्या कारणाने सेवा दिली जाऊ शकत नाही, असं सांगण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे काँग्रेसचे आमदार गेल्या काही दिवसांपासून इथेच मुक्कामी असल्याचं कळत आहे. मुख्य म्हणजे राज्यापासून कितीही दूर असले करीही सत्तास्थापनेच्या घडामोडींवर मात्र ते लक्ष ठेवून आहेत हेसुद्धा तितकंच खरं.