Gas Cylinder Blast : सिलेंडर स्फोट दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

पुण्यात सिलिंडर स्फोटात दोघांचा मृत्यू; इमारतीची भिंत कोसळल्यानं 6 जण जखमी; परिसर हादरला

Updated: Dec 22, 2022, 11:02 AM IST
Gas Cylinder Blast : सिलेंडर स्फोट दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी title=
Gas Cylinder Blast latest marathi news cooking gas cylinder blast in chakan pune nz

पुणे(चाकण): आपण अनेकदा गॅस सिलिंडर स्फोट (Gas Cylinder Blast) झाल्याच्या बातम्या अनेकदा पाहतो. या घटनांमध्ये जखमी आणि मृत्यू पावणाऱ्यांची संख्या कधी कमी जास्त असते. गॅस सिलिंडर स्फोटामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडालेली पाहायला मिळते. अशीच एक घटना पुण्यातील (Pune) चाकण या परिसरात घडली आहे. या घटनेमुळे अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत. 

नेमकं घडलं काय?

पुणे येथील चाकण औद्योगिक क्षेत्रातील राणुबाईमळा येथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास एका दुमजली इमारतीत घडली. या घटनेमुळे परिसरात लोकांची खळबळ उडाली. या घटनेत जीवीतहानी झाली असून काहीजण गंभीर जखमी देखील झाले.  स्फोट इतक्या मोठ्या प्रमाणात झाला की त्या दुमजली इमारतीची भिंत कोसळली. या घटनेत एका  वयोवृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला तर आगीच्या दुदैवी घटनेत सहा जण गंभीर भाजले असुन त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जमखीमधील 19 वर्षीय तरुणाचा पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यु झाला. 

या स्फोटात चंद्रभागा पांडुरंग बिरदवडे (वय 75) आणि अक्षय सुरेश बिरदवडे (वय 18) यांचा मृत्यू झाला असून लक्ष्मीबाई बिरदवडे (वय 78), तुकाराम परशुराम बिरदवडे, संगीता सुरेश बिरदवडे (वय 40), , वैष्णवी ऊर्फ ताई सुरेश बिरदवडे (वय 20) हे किरकोळ जखमी झाले आहेत. तर अन्य भाडेकरूदेखील यात जखमी झाले आहेत. याच्यांवर रुग्णालयात तातडीने उपचार सुरु आहेत. 

 

सिलिंडर स्फोटच्या घटनेने मोठे नुकसान

चाकण औद्योगिक क्षेत्रातील राणुबाईमळा येथे राहणारे भाऊ परशुराम बिरदवडे यांच्या घरात अचानक घरगुती सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत एका वृद्ध महिलेचा आणि एका तरुण मुलाचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती होताच घटनास्थळी पोलीसांनी हजेरी लावली. घटना रात्री घडल्यामुळे रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी मदतकार्य सुरू होते. 

या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सिलेंडरमधून गळती झाल्याने हा स्फोट झाल्याचा अंदाज लावला जात आहे. चाकण एमआयडीसीच्या परिसरात येत असल्यामुळे तिथे लोकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु असते. या अचानक घडलेल्या या घटनेमुळे बिरदवडे कुटुंब हादरून गेले आहे. सिलिंडर स्फोटाच्या घटनेने बिरदवडे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून ते तणावाखाली आहेत.