Gram Panchayat Election 2022 : ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवारांनी गुलाल उधळला. मात्र, धाराशिव तालुक्यातील तेर गावांमधील 23 वर्षीय पृथ्वीराज आंधळे या तरुणाची सध्या महाराष्ट्रात चर्चा होत आहे. कारण त्याने बड्या राजकीय नेत्याला चांगलाच दणका दिलाय. तरुण सवंगड्याला घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ. पदमसिंह पाटील यांच्या विरोधात ग्रामपंचायत पॅनेल उभे केले. या निवडणुकीत 17 पैकी 8 जागा जिंकून डॉ. पदमसिंह पाटील पॅनेलला चांगला घाम फोडला. या त्याच्या कामगिरीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी या तरुणांला शुभेच्छा देताना त्याचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, त्याने सोशल मीडियावर या तरुणाची जोरदार चर्चा आहे.
वय वर्षे 23. पृथ्वीराज आंधळे. धाराशिव तालुक्यातील तेर गावचा हा तरुण. सध्या राज्यभर या तरुणाचीच चर्चा आहे. कारण आहे ग्रामपंचायत निवडणुकीच. राज्यातील राजकारणातला बडेप्रस्थ समजल्या जाणाऱ्या डॉ. पदमसिंह पाटील यांच्या विरोधात या तरुणांने ग्रामपंचायत निवडणुकीत तरुण सवंगड्याला घेऊन एक पॅनेल उभे केले आणि या पॅनेलने डॉ. पदमसिंह पाटील यांच्या पॅनलला अक्षरशः घाम फोडला. 17 पैकी आठ जागा यांनी जिंकल्या तर उर्वरित जागा अवघ्या काही मतांनी ते हरले आहेत.
डॉ. पदमसिंह पाटील यांच्या विरोधात या तेवीस वर्षे तरुणांनी केलेल्या राजकीय संघर्षाचा सध्या राज्यभर कौतुक होते आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तसेच अनेक मोठ्या नेत्यांनी फोनवर शुभेच्छा देऊन या तरुणाचं अभिनंदन केलं आहे. सोशल मीडियावर तर या तरुणाची सध्या अक्षरशः क्रेझ निर्माण झाली आहे. सध्या तो राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरतोय.
राज्यात सात हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा (Grampanchayat Election) निकाल लागला. त्यापैकी दोन ठिकाणी उमेदवारांपेक्षा (Candidate) नोटाला (NOTA) जास्त मते मिळाली. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील कांगणी गावात ग्रामपंचायतची मतमोजणी झाली. वॉर्ड क्रमांक दोनमध्ये नोटोला सर्वाधिक म्हणजे 285 मते मिळाली. शितल अशोक कोरे या उमेदवाराला त्याखालोखाल म्हणजे 279 मते मिळाली. तर अमृता पाटील या उमेदवाराला 46 मते मिळाली. मात्र, दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेल्या शितल अशोक कोरे यांना विजयी घोषित केलं. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले.
दुसरीकडे पुणे (Pune) जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील म्हाकोशी गावातील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये असाच प्रकार झाला. इथे नोटाला 104 मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकाची 43 मते ही रेखा विजय साळेकर या उमेदवाराला मिळाली. त्यामुळे गावात काही काळ गोंधळाचं वातावरण होतं. त्यामुळे काही वेळ निकाल राखून ठेवण्यात आला. नंतर दुस-या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या उमेदवार रेखा विजय साळेकर यांना विजयी घोषित केलं.