Kalyan Crime News : महाराष्ट्राला हादरावणारी घटना कल्याणमध्ये घडली आहे. कुंटुबातच महिला असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सासरा, दिर, आणि अल्पवयीन नातेवाईकाने विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेवर राहत्या घरातच सासरा, दिर, आणि एका अल्पवयीन नातेवाईकाने सामूहिक बलात्कार केला. या घडलेल्या अत्याचारानंतर पीडित महिलेने आपल्या पतीला याबद्दल सांगितले. मात्र, पतीने देखील तिच्यावर संशय घेत दगड-विटां मारत तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर उपचारादरम्यान पोलिसांना ही माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीसह सासरा आणि दिराच्या विरोधात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी नराधम सासरा आणि दिराला अटक केली आहे. अल्पवयीन नातेवाईकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, या प्रकाराने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
12 वर्षीय आदिवाशी मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून नंतर तिची हत्या करण्यात आलीय.. नराधमानं अत्याचार करून नंतर तिची दगडानं ठेचून हत्या केलीय. शेतात काम करून घरी परत येत असतांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलाय. मुलीला 100 फूट फरफटत नेऊन तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय.. चोपडा तालुक्यातील मालापूर-विरवाडे गावातील ही घटना आहे.. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आऱोपीला अटक केलीय.. या घटनेविरोधात शाळकरी मुलींसह नागरिकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या देत, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.