गणेश नाईक यांच्यासाठी मुलगा संदीप यांची ऐरोलीतून माघार

भाजपच्या पहिल्या यादीत गणेश नाईकांना स्थान न मिळाल्याने गणेश नाईक नाराज होते.  

Updated: Oct 2, 2019, 04:24 PM IST
गणेश नाईक यांच्यासाठी मुलगा संदीप यांची ऐरोलीतून माघार title=
संग्रहित छाया

नवी मुंबई : भाजपच्या पहिल्या यादीत गणेश नाईकांना स्थान न मिळाल्याने गणेश नाईक नाराज होते. मात्र आता गणेश नाईक ऐरोलीतून निवडणूक लढणार आहेत. गणेश नाईक यांच्याऐवजी पहिल्या यादीत संदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर नाईक कुटुंबात नाराजी होती. आता संदीप नाईक यांच्या तिकीटावर गणेश नाईक लढणार आहेत. 

 भाजपमध्ये ढेरेदाखल झालेल्या गणेश नाईक यांच्या पदरी निराशा आली. पहिल्या यादीत उमेदवारी न मिळाल्याने गणेश नाईक नाराज होते. त्यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर भेट दिली. त्यानंतर आज सकाळी त्यांनी मातोश्रीवरही हजेरी लावली. मात्र, दोन्ही भेटीत काय ठरले त्याची माहिती हाती आलेली नाही.

गणेश नाईक नाराज, बोलवली बैठक

गणेश नाईक यांना भाजपकडून बेलापूरमधून उमेदवारी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. परंतु बेलापूरची जागा ही विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना दिली गेली. त्यामुळे गणेश नाईक हे कार्यकर्ते आणि नगरसेवकांच्या अग्रहाखातर ऐरोली मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ऐरोली मतदार संघातून आमदार संदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु गणेश नाईक हे अर्ज भरणार आल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.  

दरम्यान, ठाणे, नवी मुंबई, पालघरमधील प्रश्न गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सोडवले जातील, अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. त्यामुळे या भागातील भाजपचा चेहरा गणेश नाईक असणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. पुन्हा एकदा गणेश नाईक ठाणे - पालघर भागात  भाजपचा जोरदार प्रचार करतील अशी शक्यता होती. मात्र, त्यांना उमेदवारी न दिल्याने गणेश नाईक नाराज झाले आहेत.