योगेश खरे झी मीडिया नाशिक : हिवाळा आला की नाशकात खवैय्य्यांच्या मैफिलीं रंगतात.. कुठं हुरडा, कुठं भरीत तर कुठं मिसळ पार्ट्या.. आणि हीच संधी साधत नाशिक शहरात खवय्यांसाठी नॉनव्हेज आणि कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय..
नॉनव्हेज म्हटलं की डोळ्यापुढे येतं चिकन, मटण किंवा मासे.. आणि चमचमीत रश्श्यासोबत कांदा कोथिंबीर... अगदी तोंडाला पाणी सुटावं असा हा मेनू... त्यातच यातील सर्व चवी एकाच ठिकाणी मिळाल्या तर?? नाशिकच्या गोदाकाठी नॉनव्हेज फूडच्या सर्व व्हरायटी उपलब्ध झाल्यात.. भरोश्याच स्वयंपाक घर म्हणजेच विश्वास लौन्स इथं भरलेल्या नॉनव्हेज फूड फेस्टीवलमध्ये... पिवळा, काळा, लाल, पांढरा आणी हिरव्या मसाल्याचा रस्साही या महोत्सवात उपलब्ध आहे. रश्श्यासोबत त्याच्या रंगाला साजेचं फ्राय फूडही.. त्यामुळे ग्राहकाच्या तोंडाला पाणी सुटले नाही तर नवलच..
कोकणातील गावरान मेनूही इथं उपलब्ध आहेत.. अस्सल खोब-यापासून बनवलेली खास कोकणी सोलकढीची चव नाशिककरांना इथं घेता येते..
धार्मिक नगरी नाशिक वायनरीच्या उद्योगामुळे जगभरात ओळखली जाऊलागली.. आता विविध फूड फेस्टिव्हल्समुळे ही नगरी पर्यटनाचीही पंढरी ठरु लागलीये..