राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पाच आमदार गेले कुठे? सकाळी हजर संध्याकाळी गैरहजर

अजित पवार गटाच्या बैठकीला पाच आमदारांनी दांडी मारली. आज सकाळी अजित पवार गटाची चिंतन बैठक पार पडली तेव्हा ते उपस्थित होते. मात्र, संध्याकाळू गैरजहर होते. 

वनिता कांबळे | Updated: Jun 6, 2024, 07:22 PM IST
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पाच आमदार गेले कुठे?  सकाळी हजर संध्याकाळी गैरहजर  title=

NCP MLA from Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशासह राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत.  राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक मुंबईत पार पडली.  सकाळी बैठकीला हजर असलेले आमदार संध्याकाळच्या बैठकीला गैरहजर होते. संध्याकाळच्या बैठकीला अमदार अनुउपस्थित असल्याने   राष्ट्रवादी अजित पवार गटाची धाकधुक वाढली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पाच आमदार गेले कुठे? अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

आज सकाळी अजित पवार गटाची चिंतन बैठक पार पडली. त्यावेळी पराभूत उमेदवारांसह अजित पवार गटाचे आमदार उपस्थित होते. मात्र, सायंकाळी मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये अजित पवार गटाच्या पाच आमदारांनी दांडी मारली आहे. 

बैठकीला अनुपस्थित असलेले अजित पवार गटाचे  आमदार

धर्मराव बाबा आत्राम, नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, राजेंद्र शिंगणे आणि अण्णा बनसोडे अशी बैठकीला दांडी मारणाऱ्या पाच आमदारांची नावे आहेत. धर्मराव बाबा आत्राम यांनी  आजारी असल्याच कळवलं आहे. नरहरी झिरवळ हे  रशियाला गेले आहेत. सुनील टिंगरे यांनी देखील कामानिमित्ताने बाहेर असल्याचे कळवले आहे. राजेंद्र शिंगणे यांनी आजारी असल्याचे कारण दिले आहे. अण्णा बनसोडे यांनी देखील काही कारणानिमित्ताने बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळवले आहे. 

पराभवानंतर बारामतीत अजित पवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केलीय. निकाल काहीही लागो आमचा विठ्ठल एकच अजितदादा, अशा आशयाचं बॅनर कार्यकर्त्यांनी लावलंय. बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यानंतर अजित पवारांना पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते धावून आल्याचं दिसतंय. अजित पवारांचे कार्यकर्ते विशाल जाधव यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आलीये. या बॅनरवरून अजित पवारांना सहानुभूती देण्याचा प्रयत्न केला गेलाय.