हॉटेलची नासधूस करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल

नागपूर पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्या साथीदारांच्या मदतीनं शहरातील वाठोडा परीसारतील एका हॉटेलमध्ये धिंगाणा घातला.

Jaywant Patil Updated: Mar 22, 2018, 10:23 AM IST
हॉटेलची नासधूस करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल title=

नागपूर : नागपूर पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्या साथीदारांच्या मदतीनं शहरातील वाठोडा परीसरातील एका हॉटेलमध्ये धिंगाणा घातला. मनोज घोडे असे, या पोलीस कर्मचार्याचं नाव असून तो अजनी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहे. हॉटेलातील तोडफोडीची ही सर्व दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. वाठोडा परिसरात रोहित फमिली रेस्टारंट नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलात १७ मार्च च्या रात्री मनोज घोडे आपल्या १५ ते २० साथीदारांसह जेवायला गेला. खाऊन-पिऊन झाल्यावर घोडेच्या साथीदारांनी अचानक हॉटेलमध्ये तोडफोड करण्यास सुरवात केली.

अचानक हॉटेलमध्ये तोडफोड

खुर्ची, टेबल,फर्निचरची पार नासधूस केली. त्यावेळी हॉटेलात जेवणासाठी आलेल्या एका कुटुंबाला जीव मुठीत धरून पळून जावे लागले. हॉटेलात तोडफोड केल्यावर हे सर्व अगदी आरामात हॉटेलातून निघून गेले. 

घोडेला नेमका कशाचा राग होता?

दोन वर्षापूर्वी मूळ मालकाने हे हॉटेल मनोज घोडे याला चालवायला दिले होते. मात्र या ठिकाणी गुन्हेगारी वृत्तीचे लोक येत असून अनेक गैरप्रकार सुरु असल्याचं माहित झाल्यावर मूळ मालकानं त्यांचाकडून हे हॉटेल परत घेतले. याचाच राग मनात धरून मनोज घोडे याने हे कृत्य केले असावे असे बोलले जात आहे.
पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

घटनेनंतर पोलीस कर्मचारी मनोज घोडे विरुद्ध नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे.