वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू

वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरुण शेतक-याचा मृत्यू झाल्याची दु्र्दैवी घटना घडलीय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 18, 2017, 06:44 PM IST
वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू  title=

बुलढाणा : वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरुण शेतक-याचा मृत्यू झाल्याची दु्र्दैवी घटना घडलीय. 

बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यातील शारा इथं ही घटना घडलीय. ज्ञानेश्वर लहाने असं या 25 वर्षीय शेतक-याचं नाव आहे. शेतात लोंबकणा-या विद्युत तारांशी संपर्क झाल्यानं ज्ञानेश्वरचा मृत्यू झालाय. त्याच्या शेतात 5 ते 7 फूटाच्या उंचीवर या तारा लोंबकळत होत्या. 

पेरणी करताना बैलाला मारण्यासाठी चाबूक वर केला. त्यावेळी चाबुकाचा स्पर्श विद्युत तारांशी होऊन ही दुर्दैवी घटना घडलीय. याबाबत या शेतक-याने वेळोवेळी विद्युत वितरण कार्यालयाकडे तक्रार केली होती. मात्र संबधित अधिका-याने या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय. 

तांबोळा इथं शेतक-याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच ही दुसरी घटना घडलीय. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार अधिका-यांबाबत जनतेतून प्रचंड रोष निर्माण झालाय.