एका फेसबुक पोस्टने वाचवले तरुणाचे प्राण...

औरंगाबाद जिल्हयातील मंठा येथे राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या करणार असल्याचा संदेश फेसबुकवर पोस्ट केला होता.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 18, 2017, 11:40 AM IST
एका फेसबुक पोस्टने वाचवले तरुणाचे प्राण...  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हयातील मंठा येथे राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या करणार असल्याचा संदेश फेसबुकवर पोस्ट केला होता. ही पोस्ट वाचून औरंगाबादमधील अॅडव्होकेट स्वाती नखाते यांनी त्वरीत याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब तरुणाला ताब्यात घेतले. सचिन काळे पाटील असे या तरुणाचे नाव आहे. नखाते यांनी वेळीच पोलिसांना याबद्दलची माहिती दिल्याने सचिनचे प्राण वाचले.

मराठा क्रांती मोर्चाच्यानिमित्त्याने सचिन आणि स्वाती यांची भेट झाली होती. यानंतर त्यांची फेसबुकवर मैत्री झाली. सचिनने रविवारी रात्री ८ वाजता आत्महत्या करणार असल्याची पोस्ट केली होती. नखाते यांनी त्यांची पोस्ट पाहताच पोलिसांनी त्याबद्दलची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी सचिनला ताब्यात घेतले. यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नखाते यांनी फेसबुकवरील पोस्टच्या स्क्रीनशॉटच्या मदतीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर सचिनच्या फेसबुक वॉलवरुन पोस्ट डिलीट करण्यात आली.