जळगाव: वर्षभर शेतकऱ्याच्या शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा. या दिवशी बैलांना रंगरंगोटी केली जाते, सजवलं जातं. बिलाची पूजा करून गावातून मिरवणूक काढली जाते. मात्र याच बैलपोळ्याला एक धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना जळगावच्या वावडदा गावात घातली आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ माजली.
जळगाव तालुक्यातील वावडदा येथे पोळा सण साजरा करत असताना एक नंदीबैल बिथरला. बिरथरलेला नंदीबैल थेट छतावर चढला. दरम्यान जे व्हायला नको होतं तेच झालं.
सदर अपघात जळगाव जिल्ह्यात वावडदा येथे पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. जळगाव तालुक्यातील वावडदा येथील गोकूळवाडा येथे पोळा सण साजरा करत असतांना शेतकऱ्यांचा बैल भलताच बिथरताला. हा बिरथरलेला बैल चक्क घरातच्या जिन्यावरून छतावर चढला. शेतकऱ्याने त्याला खाली उतरवण्याच्या प्रयत्ने देखील केला. मात्र ती अप्रिय घटना घडलीच.
शेतकरी बैलाला खाली उतरवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र अशातच घराच्या छतावर चढलेला बैल छतावरून पडला. खाली सिमेंट काँक्रीटचा रास्ता असल्याने या घटनेत हा नंदीबैल गंभीररित्या जखमी झाला आहे. या घटनेमुळे वावडदा गावात खळबड उडाली आहे.
Emotional Moment For Farmers bull fell down from terrace from jalgaon maharashtra