हत्ती हट्टाला पेटल्याने, मिरवणुकीचे 'वाजले की बारा'

एक हत्ती असा काही पाण्यात हटून बसला की उठता उठेना....

Jaywant Patil Updated: Apr 10, 2018, 12:29 PM IST

अहमदनगर : हत्ती तसा शांत प्राणी आहे, पण तो हट्टाला पेटला तर त्याच्या सारखा हट्टी प्राणी कोणताच नाही. तसाच हा हत्ती हटून बसला आहे. अहमदनगरच्या अकोलेमध्ये एका मिरवणुकीची तयारी सुरू होती. या मिरवणुकीसाठी हत्ती आणण्यात येणार होता. हत्ती येईपर्यंत मिरवणूक सुरू होत नव्हती. पण हत्तीची आंघोळच उरकेना. उष्णतेनं हैराण झालेला हत्ती नदीतून बाहेरच येईना. 

एस्सेल वर्ल्ड में रहुँगा मैं, घर.. घर... नही जाऊँगा मैं....!

गजराजांची स्वारी पाण्यातून जराही हलायला तयार नाही. प्रवरा नदीत सध्या भरपूर पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे गजराजांना मनसोक्त नदीत डुंबायला मजा येत होती. बाहेर मिरवणुकीचा खोळंबा झाला होता. पण आधी मनसोक्त स्नान नंतरच मिरवणूक, यावरच गजराज ठाम होते. अखेर मोठ्या प्रयत्नांनी माहुतानं या गजराजांना नदीच्या बाहेर काढलं.