थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण, डोक्यात घातली कृषी अवजारं

Electricity bill recovery : थकीत वीजबिल वसुली महावितरणच्या अधिकाऱ्यांना भारी पडली आहे.  

Updated: Dec 24, 2021, 03:09 PM IST
थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण, डोक्यात घातली कृषी अवजारं  title=

जळगाव : Electricity bill recovery : थकीत वीजबिल वसुली महावितरणच्या अधिकाऱ्यांना भारी पडली आहे. अभियंता आणि कर्मचाऱ्यांच्या डोक्यात कृषी अवजारं मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. थकीत वीजबिल (Electricity bill) वसुलीसाठी आलेल्यांना पळवून लावण्याचा नागरिकांकडून प्रयत्न झाला. (MSEDCL employees beaten up in Jalgaon)

जळगावात सिंधी वसाहतीत महावितरणचे अभियंता आणि कर्मचाऱ्यांना ही मारहाण करण्यात आली आहे. थकीत वीजबिल वसुलीसाठी गेले असताना ही मारहाण करण्यात आली. यावेळी नागरिकांनी वसुलीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या डोक्यात कृषी अवजार मारण्याचा प्रयत्न केला.

नागरिकांनी केलेल्या मारहाणी दोन कर्मचाऱ्यांनी किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी सहायक अभियंता जयेश तिवारी यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर टिकमदास पोपटानी यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पोपटानी यांना ताब्यात घेतले आहे. पोपटानी यांचे 2460 रुपये बील 75 दिवसांपासून थकीत होते. हे बिल वसूल करण्यासाठी कर्मचारी गेल्यानंतर त्यांना धमकविण्यात आले.