कोरोनाचा धोका । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंधाबाबत आज मोठी घोषणा करण्याची शक्यता

Corona New Variant : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron) धोका राज्यात वाढत आहे. ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत आहे. त्यामुळे निर्बंधाबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता.

Updated: Dec 24, 2021, 12:58 PM IST
कोरोनाचा धोका । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंधाबाबत आज मोठी घोषणा करण्याची शक्यता title=
संग्रहित छाया

मुंबई : Corona New Variant : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron) धोका राज्यात वाढत आहे. ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत आहे. तसेच कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे. तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. त्यातच केंद्र सरकारने राज्यांना सतर्क केले आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) हे याबाबत जनतेला मार्गदर्शन करण्याची शक्यता असून यावेळी ते घोषणा करु शकतात. (Corona crisis - Chief Minister Uddhav Thackeray is likely to make a big announcement today regarding Covid restrictions)

कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने राज्य सरकार निर्बंधाबाबत मोठे पाऊल उचलणार आहे. रात्री जमावबंदी लागू केल्यानंतर 4 पेक्षा जास्त व्यक्तींना एका ठिकाणी जमा होता येणार नाही. ख्रिसमस संपल्यानंतर रविवार रात्रीपासून जमावबंदी लागू होण्याची शक्यता आहे.

रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत चर्चा केली. मध्य प्रदेशने रात्रीची जमावबंदी लागू केली आहे, त्यापाठोपाठ महाराष्ट्रातही जमावबंदी लागू होण्याची शक्यता अधिक आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड निर्बंधाबाबत संकेत दिले होते. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नाईट कर्फ्यूवर चर्चाही झाली. ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे नाईट कर्फ्यू लागणार असे संकेत मिळत आहे. आज कोविडसंदर्भात नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.