निवडणुकीत खोके भारी पडले; पराभवानंतर एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश पाटील या दिग्गजांचा दारुण पराभव झालाय. तर या निवडणुकीत खोके भारी पडले आणि आमचा आवाज दबला गेला असा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे.   

Updated: Dec 11, 2022, 06:08 PM IST
निवडणुकीत खोके भारी पडले; पराभवानंतर एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप title=

Jalgaon Dudh Sangh Election :  जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. भाजपा-शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलने 20 पैकी 16 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. 

एकनाथ खडसेंच्या महाविकास आघाडी सहकार पॅनलला केवळ 4 जागाच जिंकता आल्या आहेत. मंत्री गिरीश महाजन,  मंत्री गुलाबराव पाटील,  भाजपा आमदार मंगेश चव्हाण,  शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील हे दिग्गज नेते विजयी  झालेत. 

तर, एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश पाटील या दिग्गजांचा दारुण पराभव झालाय. तर या निवडणुकीत खोके भारी पडले आणि आमचा आवाज दबला गेला असा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे. 
या निवडणुलीत भाजपचे मंत्री गिरीश महाजन , शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.  या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं होत. 

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलची सरशी झालीय. विजयानंतर खडसेंचे कट्टर विरोधक आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी विजयाचा जल्लोष केला. यावेळी गिरीश महाजन कार्यकर्त्यांसोबत नाचताना दिसले. या निवडणुकीत खडसे गटाचा सुपडा साफ करत भाजप-शिंदे गटानं 20 पैकी 16 जागा जिंकल्या.