Nirbhaya Fund: गाड्यांचा वाद शिंदे-फडणवीस सरकारला अडचणीत आणणार? सुप्रिया सुळेंसह महिला नेत्या भडकल्या!

SUVs bought with Nirbhaya Fund: राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) हा मुद्दा उचलून धरल्याने मोठा राडा होत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता राज्यातील महिला नेता या प्रकरणावरून आक्रमक झाल्या आहेत.

Updated: Dec 11, 2022, 05:44 PM IST
Nirbhaya Fund: गाड्यांचा वाद शिंदे-फडणवीस सरकारला अडचणीत आणणार? सुप्रिया सुळेंसह महिला नेत्या भडकल्या! title=
Nirbhaya Fund

Nirbhaya Fund SUVs: राज्यातील महिलांविरोधात होणारे गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने निर्भया पथकाची (Nirbhaya Pathak) स्थापना केली होती. यासाठी सरकारने निर्भया फंडाची निर्मिती देखील केली होती. पण आता मुंबईत महिलांच्या सुरक्षेऐवजी शिंदे गटातील खासदार आणि आमदारांच्या संरक्षणासाठी हा निधी वापरला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) हा मुद्दा उचलून धरल्याने मोठा राडा होत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता राज्यातील महिला नेता या प्रकरणावरून आक्रमक झाल्या आहेत. (SUVs bought with Nirbhaya Fund diverted to provide Y plus security to Shinde legislators supriya sule aggresive marathi news)

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारने निर्भया पथक स्थापन केलं. गृह खात्याला निधी देऊन महिलांसाठी विशेष निर्भया पथ स्थापन करावं त्यासाठी गाड्या खरेदी करण्याचा आदेश दिला होता. या निधीचा गैरवापर करून पोलिसांनी सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्यासोबत जे 50 आमदार गेले होते त्यांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) आणि आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन केला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गस्त घालण्यासाठी गाड्या पोलिसांना दिल्या होत्या. निर्भय पथक (Nirbhaya pathak) स्थापन केलं होतं. याचा उपयोग झाला... पोलिसांनी कशी मदत केली हे पाहिलं... 30 कोटींचा निधी वापरण्यात आला. जुलै महिन्यात भाजपने कुटणीती वापरून सत्तेतून पायउतार केलं. बंडखोर आमदारांना बोलेरो गाड्या जीप संरक्षणासाठी दिल्या, 50 आमदारांना वाय सुरक्षा दिली, असा आरोप मनीषा कायंदे यांनी केलाय.

समृद्धी मार्गावर (Samruddhi Mahamarg) ट्रायल रन झालं तेव्हा गृहमंत्री यांनी जी गाडी चालवली ती कोणाची आहे सरकारी गाडीतून का नाही गेली?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील या प्रकरणावर वक्तव्य केलंय. महिलांच्या सुरक्षेसाठी (Safety of Women) आणण्यात आलेल्या गाड्या लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी लावल्या हे चुकीचं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आणखी वाचा - "निर्भया फंडांतून घेतलेल्या गाड्या शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी"; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

दरम्यान, निर्भया फंड (Nirbhaya Fund) हा फंड केंद्र सरकारमध्ये मनमोहनसिंग यांनी तयार केला होता. महिलांच्या सुरक्षेसाठीच हा फंड होता. या सरकारमध्ये व्हीआयपी कल्चर (VIP Culture) लागू होतंय हे चुकीचं आहे. ही एक दुर्दैवी घटना आहे. महिलांच्या बाबतीत अश्या घटना घडताच फास्टट्रॅक कोर्टात चालवली पाहिजे, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत.