अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकाला फटका

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुचा जोरदार फटका द्राक्ष पिकांना बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. निफाड तालुक्यातील द्राक्षांच्या नुकसानीचा आकडा करोडो रुपयांच्या घरात पोहोचलाय आहे. तर, निफाड तालुक्यातील कारसूळ, नारायण टेंभी आणि बेहेड या गावांतील द्राक्षबागांचेही मोठे नुकासन झाले आहे.

Updated: Nov 12, 2017, 10:38 PM IST
अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकाला फटका title=

नाशिक : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुचा जोरदार फटका द्राक्ष पिकांना बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. निफाड तालुक्यातील द्राक्षांच्या नुकसानीचा आकडा करोडो रुपयांच्या घरात पोहोचलाय आहे. तर, निफाड तालुक्यातील कारसूळ, नारायण टेंभी आणि बेहेड या गावांतील द्राक्षबागांचेही मोठे नुकासन झाले आहे.

कारसूळ गावात एकशे सत्तर शेतकर्‍यांचे सुमारे शंभर हेक्टर क्षेत्र बाधीत झालंय. हा अकडा साडेचौदा कोटींवर गेलाय... ही आकडेवारी केवळ निफाड तालुक्याची आहे या शिवाय दिंडोरी नाशिक तालुक्यातही द्राक्षबागांचं मोठं नुकसान झालंय. जर पंचनामा केला तर द्राक्ष निर्यात करण्याची परवानगी मिळणार नाही या भीतीने अनेकांनी आपले नुकसान सात बारावर आणलेले नाही. यामुळे शेतकरी आपल्याच खिश्यातून खर्च करून पुन्हा फवारणी करत बागा वाचविण्याचा प्रयत्न करतोय.

सरकारची अश्वासने सुरूच

दरम्यान, अवकाळी पाऊल, थंडी, उन वारा, कीड, रोगराई आणि विविध गोष्टींमुळे शेतकरी मेटाकूटीला आला असताना सरकारची अश्वासनांची खैरात मात्र सुरूच आहे. वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून प्रोत्साहनपर 25 हजार रूपयांची रक्कम देणार असल्याचे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटले आहे. दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. दरम्यान, शेतकऱ्यांना प्रोस्ताहनपर रक्कम देण्याचे अश्वानस देताना ही रक्कम कर्जमाफी योजनेंतर्गत सरकार देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, या रकमेत वाढही केली जाणार असल्याचे ते म्हणाले.