चुकीच्या बांधकामामुळेच दोन मुलांचा मृत्यू, बिल्डर खोब्रागडेला अटक

 उच्च दाबाच्या वायरचा शॉक लागून नागपुरात आठवडा भरात ३ लहान मुलांचा मृत्यू झालाय. गेल्या आठवड्यात झालेल्या पियुष आणि प्रत्युष या दोन जुळ्या भावांच्या मृत्यू प्रकरणी बिल्डर आनंद खोब्रागडेला अटक झाली. 

Updated: Jun 23, 2017, 12:02 AM IST
चुकीच्या बांधकामामुळेच दोन मुलांचा मृत्यू, बिल्डर खोब्रागडेला अटक  title=

नागपूर :  उच्च दाबाच्या वायरचा शॉक लागून नागपुरात आठवडा भरात ३ लहान मुलांचा मृत्यू झालाय. गेल्या आठवड्यात झालेल्या पियुष आणि प्रत्युष या दोन जुळ्या भावांच्या मृत्यू प्रकरणी बिल्डर आनंद खोब्रागडेला अटक झाली. 

११ किंवा ३३ किलो वॉट क्षमतेच्या वीज वाहिनीच्या खाली नागपुरात अनेक ठिकाणी वस्ती आहे. एका सर्वेक्षणानुसार शहरात एकूण १४१ मनोरे आहेत ज्याच्या खाली अशी वस्ती झालीय. त्यामुळे हे अक्षरशः मृत्यूचे सापळे झालेत. 

बिल्डर आनंद खोब्रागडेने केलेल्या चुकीच्या बांधकामामुळेच पियुष आणि प्रत्युष या ११ वर्षांच्या जुळ्या भावंडांचा शॉक लागून मृत्यू झाला. सर्व नियमांची पायमल्ली करत खोब्रागडेनं हे बांधकाम केलं होतं. मात्र आपण काही केलंच नाही, असा आव हा बिल्डर आणत आहे. 

नागपुरात उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने दोन जुळ्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा तसाच अपघात काल घडला. उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीमुळे गेल्या १० दिवसांत तीन निरपराध बालकांचा मृत्यू झालाय. त्यामुळे या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांवर कारवाईची मागणी करण्यात येतेय. 

नागपूरच्या एमआयडीसी भागात हायटेंशन लाईनचा स्पर्ष झाल्याने एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. स्वयम पांडे नावाचा हा मुलगा गच्चीवर खेळत असताना त्याचा तारांशी संपर्क झाला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. स्वयंमचा स्पर्श या हायटेशन वायरला झाल्याने आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.