मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार याचे मोठं विधान

Ajit Pawar : मंत्रीमंडळ विस्ताराबाबत महायुतीचे 3 वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याचं उदय सामंतांनी म्हटलं आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 7, 2024, 11:27 PM IST
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार याचे मोठं विधान  title=

Maharashtra Government Formation:    मुख्यमंत्री आणि दोन उपमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आता प्रतीक्षा आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार?, कुणाला कोणतं खातं मिळणार याची जोरदार चर्चा सुरू झालीय.. त्यातच मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक मोठं विधान केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

महायुतीच्या सरकारचा शपथविधी पार पडला आहे. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही झालेला नाहीय. आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशना आधी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप होणार की त्यानंतर हे अद्याप स्पष्ट होताना दिसत नाही. महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपकडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्यापही अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीय. त्यामुळे खाते वाटपाबाबत भाजप निवांत आहे का अशी चर्चा एकीकडे सुरू आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत  मोठं वक्तव्य केलंय. 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होण्याची शक्यात आहे.

दरम्यान त्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे असं अजित पवार म्हणालेत. महायुती सरकारचा शपथविधी निकालानंतर अनेक दिवस रखडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने लवकरात लवकर शपथविधी करून घेण्यासाठी आग्रह धरल्याची चर्चा होती. भाजप आणि राष्ट्रवादीचा शपथविधी उरकून घ्यावा अशी राष्ट्रवादीची मागणी होती. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठीही राष्ट्रवादीची घाई सुरू असल्याचं पाहायला मिळतंय..

दरम्यान,  महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांना एक मोठा दिलासा मिळालाय.. आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली तब्बल 1 हजारांहून अधिकची मालमत्ता दिल्ली लवादाने मुक्त केलीय.. त्यावरून विरोधकांनी अजित पवारांसोबतच भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.. तर मला राजकीय अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय, असं म्हणत विरोधकांच्या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलं.