कल्याणमध्ये सराईत गुन्हेगाराची बॅनरबाजी

आपल्या राजकीय नेत्याला खुश कऱण्यासाठी अनेकदा त्याचे कार्यकर्ते शहरभर बॅनरबाजी करत असतात. पण कल्याणमध्ये मात्र एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. 

Updated: Aug 5, 2017, 12:30 PM IST
कल्याणमध्ये सराईत गुन्हेगाराची बॅनरबाजी title=

कल्याण : आपल्या राजकीय नेत्याला खुश कऱण्यासाठी अनेकदा त्याचे कार्यकर्ते शहरभर बॅनरबाजी करत असतात. पण कल्याणमध्ये मात्र एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. 

येथे चक्क एका आरोपीने एका पोलिस निरीक्षकाला शुभेच्छा दिल्या आहेत. कल्याण परिसरातील विविध पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या दीपक लोखंडे या सराईत गुन्हेगाराने कल्याणच्या अत्यंत गजबजलेल्या आधारवाडी चौकात एक बॅनर लावला आहे.

या बॅनर वर त्याने एका पोलिस अधिकाऱ्याला त्याची बढती झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. मला याबाबत कोणतीच कल्पना नव्हती. तसेच अशा पद्धतीने कुणी माझ्या फोटोचा वापर करुन बॅनरबाजी करत असेल तर ते चुकीचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.