डेटिंगचा नाद भोवला! वृद्धाला बसला इतक्या लाखांचा गंडा

मोबाईलवर Unknown कॉल आणि मुलगी...वृद्धाला अस जाळ्यात ओढत बँक खातं केलं रिकामी 

Updated: Nov 11, 2022, 04:51 PM IST
डेटिंगचा नाद भोवला! वृद्धाला बसला इतक्या लाखांचा गंडा  title=

पुणे : गेल्या अनेक वर्षापासून ऑनलाईन फसवणूकीच्या (Online Fraud) घटनांमध्ये वाढ झाली आहे. ऑनलाईन गंडा घालणारे चोर विविध क्लुप्त्या लढवून सर्वसामान्य नागरीकांना गंडा घालत आहेत. आता अशीच घटना समोर आली आहे. या घटनेत एका 79 वर्षीय वृद्धाला डेटिंग अॅपचा (Dating App) नाद चांगलाच भोवला आहे. या डेटिंग अॅपमुळे त्याला 17 लाखाचा गंडा बसला आहे. या प्रकरणी आता वृद्धाने पोलिसात तक्रार केली आहे.या तक्रारीनंतर पोलीस कसून तपास करत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,79 वर्षीय वयोवृद्ध हे बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना गेल्या डिसेंबर महिन्यात मोबाईलवर एक अनोळखी व्यक्तीचा कॉल (Unknown call) आला होता. या कॉलवर त्यांना 'तुम्हाला डेटिगंसाठी मुलगी हवी आहे का?' अशी विचारणा करण्यात आली होती. यावर वृद्धाने होकार दिला होता. 

वृद्धाने अनोळखी व्यक्तीची कॉलवर ऑफर स्विकारताच त्याला काही रक्कम भरण्यास सांगितली होती. यासाठी काही नंबरही दिले होते.आरोपींच्या खात्यात रक्कम भरल्यानंतर वृद्ध व्यक्तीला नेहमी त्या नंबरवरून फोन यायचे आणि पैश्याची मागणी केली जायची. असे साधारण 7 महिने वृद्धासोबत सुरू होते. या दरम्यान त्याला 17 लाखाचा गंडा (Online Fraud)  घालण्यात आला. 

या प्रकरणात वृद्धाला (Online Fraud) आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Police station) धाव घेतली. याप्रकरणी आता अनोळखी व्यक्तीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.