रायगडात थरावरून कोसळून एका गोविंदाचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले आहे.  

Updated: Aug 24, 2019, 07:57 PM IST
रायगडात थरावरून कोसळून एका गोविंदाचा मृत्यू title=

रायगड : जिल्ह्यात दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले आहे. दहीहंडी फोडताना पाचव्या थरावरून कोसळून एका गोविंदाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. अर्जुन खोत (२५) असे मृत गोविंदाचे नाव आहे. म्हसळा तालुक्यातील खरसई गावात ही घटना घडली. तर ठाण्यातल्या दहीहंडी उत्सवात नऊ थर लावण्याच्या विक्रमाची यंदाही जय जवान पथकानं बरोबरी केली. 

दरम्यान, दादर येथील प्रसिद्ध जिवादेवाशी निवास मंडळाची दहीहंडी साईराम मित्र मंडळाने आठ थर रचून फोडली. चेंबूर येथे विघ्नहर्ता गोविंदा पथकाने आठ थर रचून हंडी फोडली. मुंबई आणि ठाण्यात वेगवेगळया ठिकाणी हंडी फोडताना थरांवरुन कोसळून ५१ गोविंदा जखमी झाल्याची माहिती आहे.  

मुंबई-ठाण्यातल्या दहीहंडी उत्सवावर यंदा पश्चिम महाराष्ट्रातल्या पुराचे सावट पाहायला मिळाले. मोठ्या धामधुमीत होणारा हा उत्सव यंदा साधेपणाने साजरा करण्यात आला. दरम्यान, मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले आहे. मुंबईतल्या विविध ठिकाणी ५१ गोविंदा जखमी झाले आहेत. तीन जखमी गोविंदांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.