Cyber Fraud: टेलिग्रामवर तरुणीकडून पार्ट टाइम जॉबची ऑफर, विश्वास ठेवल्याने बसला १.३ कोटींचा गंडा

Cyber Crime: मध्य मुंबईत राहणाऱ्या एका ५३ वर्षाच्या इसमाला सायबर फ्रॉडमध्ये १.३ कोटी गमवावे लागले. त्यानंतर आपली सायबर फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. पण तोपर्यंत फारच उशीर झाला होता. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 16, 2023, 06:31 PM IST
Cyber Fraud: टेलिग्रामवर तरुणीकडून पार्ट टाइम जॉबची ऑफर, विश्वास ठेवल्याने बसला १.३ कोटींचा गंडा title=

Cyber Crime: मध्य मुंबईत राहणाऱ्या एका ५३ वर्षाच्या इसमाला सायबर फ्रॉडमध्ये १.३ कोटी गमवावे लागले. त्यानंतर आपली सायबर फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. पण तोपर्यंत फारच उशीर झाला होता. ९ फेब्रुवारी रोजी इसमाच्या टेलिग्रामवर एका महिलेचा पार्ट टाइम जॉबसाठी मेसेज आला. या मेसेजला इसमाने रिप्लाय केला. काही मुव्ही आणि हॉटेल्सच्या लिंक शेअर करते, त्याला रेटींग कर आणि त्याचे स्क्रिनशॉट पाठव. त्यातून तुला पैसे मिळतील, असे तिने सांगितले.

इसमाने सुरुवातील हे काम अगदी प्रामाणिकपणे केले. त्यातून त्याला ७००० रुपयांची कमाई देखील झाली. आणि इथूनच फसवणुकीची सुरुवात देखील झाली. बॅंकेत ७ हजार आले पण १.२७ कोटी इतक्या रक्कमेवर त्याला पाणी सोडावे लागले. 

फसवणूक करणाऱ्या व्यक्ती सुरुवातीला काही रुपयांची लालसा दाखवून त्यानंतर समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करतात. त्यानंतर मोठी रक्कम गुंतवायला सांगतात आणि अकाऊंट खाली करुन पसार होतात. 

इसमाला नोकरीची गरज आहे ओळखून तरुणीने वेब लिंक दिली. तसेच बॅंक अकाऊंट नंबर मागविला. त्याला लॉगिन आणि पासवर्ड दिला. त्याला दहा हजार रुपये बॅंकेत गुंतवायला सांगितले. एका हॉटेलला रेटींग देण्यास सांगितले. या कामाचे त्याच्या अकाऊंटमध्ये १७, ३७२ रुपये जमा झाले. त्यानंतर तरुणीने त्याला ३२ हजार गुंतवायला सांगितले. काम झाल्यावर बॅंक खाते तपासायला सांगितले. त्यात ५५ हजार रुपये आले होते. यानंतर त्याची लालसा वाढत गेली आणि त्याने ५० हजार रुपये तरुणीला पाठविले. या कामाचे त्याला ५५ हजार रुपये मिळाले. 

१७ मे रोजी इसमाने ४८ लाख रुपये तरुणीने दिलेल्या बॅंक खात्यात पाठविले. त्यानंतर त्याला ६० लाखाचे प्रॉफिट झाल्याचे दिसले. 

जर तुम्हाला ६० लाख हवे असतील तर अधिक ३० लाख बॅंक अकाऊंटला पाठवाले लागतील, असे तरुणीने इसमाला सांगितले. त्यानंतर १८ मे रोजी खूप ट्रांसाक्शन होऊन त्याने ७६ लाख रुपये तरुणीला पाठविले. 

रिव्ह्यू करुन देखील पैसे मिळत नसल्याने त्याने तरुणीशी संपर्क साधला. पण आता ती तरुणी आणखी पैसे मागू लागली होती. यानंतर त्याने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांना नवी माहिती उघड झाली. त्यानुसार उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील आठ बॅंक खात्यामध्ये रक्कम वळती झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. 

फेब्रुवारी ते मे दरम्यान एकूण १.२७ कोटी रुपयांची रक्कम आठ बॅंक खात्यात आली. ही बॅंक खाती फ्रीज केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.