कराडमध्ये आढळली सात फुटांची मगर

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात नागरिकांच्या मदतीने सुमारे सात फुटांची मगर पकडण्यात वनविभागाला यश आलं. ग्रामस्थांना खाडेशी बंधा-याजवळ असणा-या रुक्मिणी मंदिराजवळ ही मगर आढळली. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 21, 2017, 08:59 PM IST
कराडमध्ये आढळली सात फुटांची मगर title=

कराड : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात नागरिकांच्या मदतीने सुमारे सात फुटांची मगर पकडण्यात वनविभागाला यश आलं. ग्रामस्थांना खाडेशी बंधा-याजवळ असणा-या रुक्मिणी मंदिराजवळ ही मगर आढळली. 

ही मगर सुमारे 6 ते 8 फूट लांबीची होती. यानंतर काही ग्रामस्थांनी वन विभाग आणि प्राणी मित्रांना याबाबतची माहिती दिली.  

मगर पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. खाडेशी बंधा-यात आणखी मगर असण्याचा अंदाज प्राणी मित्रांनी व्यक्त केलाय. मगर आढळल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.