महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील वेण्णा लेक धरणाची गळती काढण्यात अखेर यश आलंय.
जलसंपदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला हे यश आलं असून या वेण्णा लेकमधून दररोज 5 लाख लीटर पाण्याची गळती होत होती. याबाबत झी मीडियाने बातमी दाखवली होती.
चार नोव्हेंबरच्या बातमीने जलसंपदा विभागाला जाग आली आणि वेण्णा लेकच्या गळती रोखण्यासाठी काम सुरू झालं. अखेर ही गळती काढण्यात जलसंपदा विभागाला यश आलं. महाबळेश्वरच्या नागरिकांनी याबाबत झी मीडियाचे आभार मानलेत.